Friday, April 19, 2024
Homeठळक घडामोडीशरद पवार यांनी राजकारणापायी जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करु नये : ना. चंद्रकांत...

शरद पवार यांनी राजकारणापायी जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करु नये : ना. चंद्रकांत पाटील

सातारा : सध्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जवळ आल्या असून दोन्ही काँग्रेसने नेहमी जातीचे राजकारण केले आहे. यंदा परिस्थिती बदलली असून शरद पवारांनी राजकारणापायी जातींमध्ये द्वेष निर्माण करु नये, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. दरम्यान, सर्वाधिक दलित व आदिवासी लोकप्रतिनिधी भाजपमधून निवडून येतात याचीही त्यांनी आठवण करुन दिली.
महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये हो त आहेत. सातारा, वाई, कोरेगाव नक्षरपालिकेच्या निवडणुकीचा आढावा घेतला. या ठिकाणी स्वातंत्र्यरित्या भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोवण्यात सुरुवात केली आहे. लोणंदच्या 2 जागा स्वत:च्या ताकदीवर जिंकल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीशी युती केली आहे. निवडणुकीपूर्वी कोणत्याही आघाडीशी भाजप जाणार नाही, असाही त्यांनी विश्‍वास व्यक्त केला.
जातीच्या राजकारणाचा वापर काँग्रेसने केला. पण आरोप भाजपवर करत राहिले. आम्ही व्यक्त होण्यापेक्षा न बोलता काम करत राहिलो. शरद पवार यांनी स्वार्थासाठी समाजस्वास्थ्य बिघडवू नये असे स्पष्ट करुन ना. पाटील पुढे म्हणाले , निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्यामुळे महसूल खात्यातील उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. जे अधिकारी ज्या जिल्ह्यातले आहेत त्यांना बाहेरच्या जिल्ह्यात नेमणुका करण्यासाठी नियमित बदल्या पुढील चार दिवसात होतील. नागपूर, अमरावती , मराठवाडा विभागाच्या बदल्या झाल्या असून पुणे, मुंबई येथील 300 उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या होतील असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे दीपक पवार, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप युवा मोर्चाचे निलेश नलावडे, अमित कुलकर्णी, सुनील काळेकर, विजय काटवटे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ. शारदा जाधव, सुवर्णाताई पाटील उपस्थित होते.

 

दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर खा. उदयनराजे भोसले यांनी जि.प. उपाध्यक्ष रवी साळुंखे, कृषी सभापती शिवाजी शिंदे यांच्यासह ना. पाटील यांच्या दालनात प्रवेश करुन त्यांचे स्वागत केले. यावेळी सुमारे 10 मिनिटे सातार्‍यातील रस्ते व डॉल्बी सिस्टीमला परवानगी मिळावी यासाठी कोल्हापूरचे आयजी विश्‍वास नांगरे पाटील यांच्याशीसंवाद साधणार असल्याचे उदयनराजेंनी आपल्या शैलीत चंद्रकांतदादांना सांगितले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular