क्रिडाई सातारा सेंटरचे ” वास्तू-2016 ” ; वास्तू विषयक भव्य प्रदर्शन

वास्तू विषयक सर्व काही 
 सातारा ः नितांत सुंदर निसर्ग लाभलेल्या सातारा शहराचे पूर्वेचे रूप पालटून आता आधुनिक-विकसनशील सातारा ही ओळख सातारा शहर व जिल्हा जगासमोर आणत आहे. सर्व दृष्टीने सुजलाम सुफलाम असलेल्या सातारा शहरामध्ये प्रॉपर्टीमध्ये केलेली गुुंतवणूक येत्या काळात खरोखरच एक गोष्ट ठरणार आहे. याच हेतूने क्रिडाई सातारा सेंटरने वास्तू-2016 या वास्तु विषयक प्रदर्शनाचे आयोजन  दि. 20 ते 23 आक्टोबर 2016 दरम्यान सातारा शहरात केले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ मा. जिल्हाधिकारी श्री. अश्‍विन मुद्गल व मा. पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. या निमित्ताने घेतलेला सातारा शहराचा लेखाजोखा…
पश्‍चिमेला सह्याद्री आणि कास पुष्प पठार, पूर्वेला नॅशनल हायवे, कृष्णा-वेण्णा संगम, तीन-चार मोठी धरणे, स्वच्छ, मोकळी प्रदूषण विरहीत हवा, दहापेक्षा अधिक दजेर्र्दार शैक्षणिक संस्था, एम.आय.डी.सी., स्वस्त रहाणीमान, शांत सामाजिक वातावरण. एका टुमदार छानश्या शहरामध्ये अजून काय हवं? पेन्शनरांचं गांव हे उपाधी मिळालेलं सातारा कात टाकतय.
सह पदरीकरणामुळे पुण्यापासून अवघ्या तासाभरावर आलेला सातारा आता सर्वांनाच खुणावतोय. शिरवळ, खंडाळ्याच्या सेझ मध्ये येणार्‍या उद्योगांना कर्मचार्‍यांच्या रहाण्याच्या दृष्टीनेसुध्दा सातारा सोयीचा ठरतोय. त्यात भर म्हणजे पुरंदरचे विमानतळ!  पुरंदरच्या विमानतळामुळे सातारा जिल्ह्याची सीमारेषाच जणू वाढलीय.
एका शहरासाठी लागणार्‍या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरल सोयीसुविधा सातार्‍यामध्ये आहेत. भरपूर आणि स्वच्छ पाणी उपलब्ध आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शांत सामाजिक वातावरण सातार्‍यात आहे.  या सर्व बाबींमुळे सातार्‍यामध्ये घर घेण्याचा पुण्या-मुंबईच्या लोकांचा कल खूपच वाढतोय.
वास्तू खरेदी हे खरंतर प्रत्येकाचच एक स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण होणं यासारखं समाधान दुसरं नाही. आज सातार्‍यामध्ये वास्तू घेण्यासाठी अनेक पर्याय अनेक रूपाने उपलब्ध आहेत. मग ते फ्लॅटच्या रूपाने असून देत किंवा प्लॉट खरेदी करून बंगल्याच्या रूपात असू देत किंवा एखाद्या व्यावसायिक जागेच्या रूपाने असू देत. पण वाढलेल्या सातार्‍यामध्ये प्रत्येक भागात जाऊन तेथील प्रोजेक्टस्ची माहिती घेणं हे तसं प्रत्येकाच्याच दृष्टीने जिकीरीचं होत आहे. यासाठी क्रिडाई सातारा ने वास्तू-2016 हे वास्तू विषयक प्रदर्शन आयोजीत केले आहे.
रूपये साडे सात लाखापासून ते रूपये एक कोटी पर्यंतचे गुंतवणूकीचे अनेक पर्याय एकाच ठिकाणी ग्राहकांना पहायला मिळतील. सातार्‍यातील सर्व नामवंत बिल्डर्स वास्तू-2016 मध्ये सहभागी होत असून सुमारे 40 हून अधिक स्टॉल्स् हे या प्रदर्शनाचे वैशिष्ठय आहे. बिल्डर्स बरोबरच बिल्डींग मटेरियलचे देखील स्टॉल्स् वास्तू-2016 मध्ये आहे.
एचडीएफसी या वित्त संस्थेने वास्तू-2016 चे प्रायोजकत्व स्वीकारले असून पॅनेशिया या लिफ्ट उत्पादकांनी सहप्रायोजकत्व स्वीकारले आहे. सातारा सिटी बिझनेस सेंटर, राधिका रोड, एस.टी. स्टँड जवळ, सातारा येथे हे प्रदर्शन दि. 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2016 रोजी भरविले जात असून कंग्राळकर असोसिएटस्, ठक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ब्रम्हा डेव्हलपर्स, कच्छी प्रॉपर्टीज, मातोश्री लँडमार्क, सिध्दीविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, एस.जी.सी. ग्रुप हे वास्तू-2016 चे इव्हेंट पार्टनर्स आहेत.
क्रिडाई ही रिअल इस्टेट डेव्हलपर्सची राष्ट्रीय पातळीवरील संस्था असून क्रिडाई सातारा ही त्याचीच शाखा आहे. सर्व बिल्डर्ससाठी क्रिडाईची नियमावली असून त्याच्या अखत्यारितच क्रिडाई मेंबर्सना काम करावे लागते त्यामुळे क्रिडाई मेंबर ही उपाधी स्वतःच्या ब्रँडला लावून घेणे हे बिल्डर्ससाठी अभिमानास्पद तर आहेच पण ग्राहकांसाठी देखील आश्‍वासक आहे. आणि म्हणूनच सातार्‍यामध्ये गुंतवणूकीसाठी इच्छूक असणार्‍या सर्वांसाठी वास्तू-2016 ही एक आकर्षक संधी आहे. एकाच ठिकाणी अनेक पर्याय वास्तू-2016 मध्ये क्रिडाई साताराच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध होणार आहेत. आणि वास्तू-2016 ला सुध्दा प्रतीक्षा आहे. चोखंदळ ग्राहकांची आणि त्यांना सेवा देण्याची.

 

तेव्हा क्रिडाई सातारा आयोजीत वास्तू-2016 या वास्तू विषयक प्रदर्शनाला दि. 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2016 दरम्यान सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत भेट द्या व आपल्या स्वप्नातील घराचे, व्यावसायिक जागेचे, ऑफिसचे स्वप्न पूर्ण करा.