शहरातील अतिक्रमणे, कास पाईप लाईवरील बोगस कनेक्शनवर कारवाई करा अन्यथा तुमच्यावर कारवाई करावी लागेल ; ना. शिवतारेंचा मुख्याधिकारी शंकर गोरेंना सज्जड दम

सातारा : सातारा शहरातील रस्त्यांवरील आणि फुटपाथवरील अतिक्रमणे तातडीने मोहिम राबून काढावीत. तसेच कास जलवाहिनीवरून ज्या हॉटेल धारकांना बेकायदेशीर पाणी कनेक्शन दिली आहेत. अशा अनाधिकृत नळ कनेक्शनवर आठ दिवसात कारवाई झाली नाहीत तर तुमच्यावरच कारवाई करावी लागेल असा सज्जड दम जलसंपदा तथा पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना दिला आहे. दरम्यान लोकशाही मार्गाने नागरीकांनी पाण्यासाठी आंदोलन केले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे  कारण काय? यावरून मुख्याधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. पोलीसांनी आंदोलकांवर गुन्हे का? दाखल  केलेत या प्रश्‍नी तुम्ही लक्ष घाला अशा सुचना ना. शिवतारे यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिल्या.
सातारा शहरातील सदर बझार येथील घरकुलामध्ये रहणार्‍या नागरीकांनी पाण्यासाठी आंदोलन केले. म्हणून पोलीसांनी 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच शहरातील पोवई नाका कासट मार्केट परीसरातील पालिकेच्या रस्त्यावर, सातारा बसस्थानकाकडे जाणार्‍या बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला असणार्‍या फुटपाथवर अतिक्रणे वाढली आहेत. नागरीकांना चालणे मुश्किल होवून बसले आहे. सातत्याने वाहतुकीच्या कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. कास पठारावरील काही हॉटेल धारकांना शहराला पाणी पुरवठा करणार्‍या कास पाईप लाईनवरून अनाधिकृत पाणी कनेक्शन दिली आहेत. पालकमंत्री तुम्ही कारवाईचे आदेश देवून पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरेंनी कोणतीच कारवाई केलेली नाही.
पालकमंत्री म्हणाले, सातारा शहरातील रस्त्यांच्या फुटपाथवरील अतिक्रमणे जिल्हाधिकारी तुम्ही तातडीने पालिका प्रशासनास मोहिम हाती घेवून काढण्याच्या सुचना करा. यावेळी उपस्थित असणारे पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरेंवर ना. शिवतारे भलतेच संतापले. खाली बसू नका, उभे राहून उत्तरे द्या. शहरातील अतिक्रमणांवर का? कारवाई करत नाही. पाण्यासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलनकांवर गुन्हे का? दाखल केले. कास पाईप लाईनवरून अनाधिकृत कनेक्शनचा अहवाल तुम्हाला मागीतला होता, त्याचे काय झाले. किती जणांवर कारवाई केली. तुम्ही काय कामे करता असे म्हणत धारेवर धरले.
पालकमंत्र्याच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना गोरे म्हणाले, शहरातील फुटपाथवरील अतिक्रणे लवकरच मोहिम घेवून काढली जातील. तसेच कास पाईप लाईनवरून 15 ग्रामंपचांयतींना अधिकृतपणे पाणी कनेक्शन दिली आहेत. मात्र ग्रामपंचायतीकडून कोणत्या हॉटेल धारकांनी अनाधिकृत कनेक्शन घेतली आहेत, त्यांच्यावर लवकरच कारवाई केल्याचा अहवाला जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला जाईल. पाण्यासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलनकांर पालिकेने गुन्हे दाखल केले नसल्याच्या खुलास शंकर गोरेंनी योवळी केला. पालकमंत्र्याचा आवाज वाढल्यानंतर उत्तरे देताना मुख्याधिकारी गोरेंची चांगलीच तारांबळ उडाली होती.