डॉ.प्रसाद जोशी यांच्या आदर्श सेवेचे कौतुक करावे तेवढे थोडेः ना. रामराजे

जोशी हॉस्पिटल फलटण यांच्यावतीने जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त वॉकेथॉन व ज्येष्ठ नागरिक मेळावा संपन्न
सातारा : जिल्ह्यातील फलटण शहरात गेली 16 वर्षे अस्थिरोग उपचार व कृत्रीम सांधेरोपण शस्त्रक्रियेत सुप्रसिध्द असलेल्या जोशी हॉस्पिटलचे डॉ.प्रसाद जोशी यांनी केवळ रुग्ण सेवा केली नाही तर आत्तापयर्ंत समाजातून विश्‍वास ,आपुलकी व प्रेम मिळवले.पुणे मुंबई सारख्या उत्कृष्ट प्रतीच्या आरेाग्य सेवा आज फलटणमध्ये रुग्णांना मिळत आहेत, ही खरोखरच अभिमानाची आणि उल्लेखनीय बाब आहे. आज डॉ.प्रसाद जोशी यांच्या या आदर्श सेवेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे उद्गार विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काढले. फलटण येथील जोशी हॉस्पिटल प्रा. लि.च्यावतीने अस्थिरोगाबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी व या आजारावर वेदना मुक्त जीवन कसे जगावे यासाठी  फलटण येथे आयोजीत केलेल्या वॉकेथॉन व ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ना. रामराजे यांनी वरील उद्गार काढले.
या मेळाव्यास प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ पदमश्री डॉ. शरद हर्डीकर म्हणून उपस्थित होते.तसेच यावेळी प्रा. शाम जोशी, सातारा येथील वैद्य स्वप्नील जोशी व डॉ. प्रसाद जोशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्याच्या प्रारंभी जोशी हॉस्पिटल पासून महाराजा मंगल कार्यालयापर्यंत उपस्थित राहीलेल्या सुमारे 300 हून अधिक ज्येष्ठ महिला आणि पुरुषांनी वॉकेथॉनमध्ये सहभाग घेत सुमारे दिड किलोमीटरचे अंतर  सर्वांनी चालत जात पूर्ण केले. तसेच हातात विविध माहीती  देणारे व  अस्थिरोगाबद्दलचे प्रबोधनात्मक फलक घेउन या वॉकेथॉनचा आनंद घेतला.
महाराजा हॉल येथे  आयोजीत मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. त्यानंतर डॉ.प्रसाद जोशी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात फलटण येथे आत्तापयंर्ंंत 1 हजार हून अधिक गुडघे व सांधे जोडणीच्या यशस्वी शस्त्रक्रिया तसेच 10 हजाराहून अधिक़ रुग्णांची एमआरआय केली गेली. आपण मागील वर्षी पासून  वॉकेथॉन आयोजीत केली व त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. जोशी हॉस्पिटलचे या उपक्रमासाठी अनेकांचे सहकायर्ं आणि मार्गदर्शन लाभले. फॅ मिली डॉक्टर ही संकल्पना पुर्नरुज्जीवीत करण्यासाठी आपण कायर्ंरत आहोत असे सांगितले.
या कार्यक्रमात फलटण तसेच परिसरातील 80 वर्षाच्या पेक्षा जास्त वयोमान असणार्‍या आणि उत्तम आरोग्यदायी जीवन जगणार्‍या 60 हून अधिक मान्यवर महिला व पुरुषांचा सत्कार शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह देउन करण्यात आला .तसेच यावेळी तयार केलेल्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
यावेळी  मार्गदर्शन करताना  ना. रामराजे पुढे म्हणालेकी, आज या मोठया वयाचे इतके चांगले ज्येष्ठ मला इथे लाभले.हा मोठा आनंद आहे. मीही वयाची 80 वर्षे आपणाकडे पाहत पुर्णं करीन. अशी माझेही मनी संकल्पना आहे. आज 70 पेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांची काळजी डॉ.घेत आहेत. आता सर्वच डॉ़क्टरांनी फीही घेतली नाही तर जास्त बरे वाटेल. आपण मानसिक दृष्ट्या आनंदी रहावे, कारण एक़टेपणा हा सर्वांच्या जीवनात मोठा अडथळा आहे. जीवन सुसह्य होण्यासाठी निराश कधी होउ नका.
कार्यक्रमाचे अध्यक्ष  ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ पदमश्री डॉ. शरद हर्डीकर  म्हणाले की, मी ही साखरवाडीचा आहे. तुमच्या सारखीच मलाही गावाकडची ओढ आहे. आज या अस्थिरोग दिनाचे औचित्य साधुन डॉक्टर व रुग्णांनी एक़त्र यावे यासाठी आयोजीत केलेला हा उपक्रम हा अतिशय उत्तम आहे. संधीवात आणि सांधेदुखी हे दोन आजार सर्वांना विशेष त्रासदायक आहेत. सांधेरोपणच्या शस्त्रक्रिया जरी खर्चिक असल्या तरी आधूनिक उपचार पध्दतीने अनेकांना आपले जीवन निरोगी आणि चांगले घालवता येत आहे.आज पुण्यासारख्या आधुनिक शहरातील तरुणांची जीवन पध्दती ही खरोखरच विचार करायला लावणारी आहे. व्यायामाचा अभाव,काहीही व कसेही खाणे,झोपेची कमतरता,आळस यामुळे आपण अनेक व्याधींना अकाली आमंत्रण दिले जात आहे. जॉईट रिप्लेसमेंट ही वरदान आहे.आपण योग्य आहार व्यायाम करुन आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा व आनंदी जग अनुभवा.
यावेळी वैद्य स्वप्नील जोशी यांनी एक आनंदी ज्येष्ठ या विषयावर आपले मार्गदर्शन करताना अकाली वृध्दत्वाची चाहूल सध्या वयाच्या 40 ते 45 व्या वर्षीच लागत आहे. शरीरात वाढत जाणारा ज्येष्ठ  वयातील वात कमी करण्यासाठी प्रयत्न करा, अपेक्षित आहार घ्या,गरजेनुसार पंचकर्म करा, साधे सोपे व्यायाम करा तसेच जागरुक राहुन वेळच्या वेळी तपासण्या करा.अनेकांशी संपर्क राखत अध्यात्मिक स्वास्थ्य जपा असे सांगितले. तर प्रा.शाम जोशी यांनी  आपल्या व्याख्यानात  मन करा रे प्रसन्न या विषयावर शरीरावर नियंत्रण ठेवणारे मन हे जरी दिसत नसले तरी मनाच्या  नियंत्रणासाठी संस्कार हवे आहेत ,आजच्या स्पर्धात्मक जगात इच्छा या वासना बनत आहेत. समाजात खोटे बोलणे वाढले आहे. यासाठी आवडते संगीत ऐका, लहान मुलांच्यामध्ये मिसळा व मन आनंदी ठेवा असा सल्ला दिला.  डॉ.सुहास जोशी यानी पाहुण्याची ओळख करुन दिली तर ज्येष्ठांच्या वतीने सौ.पाळंदे यांनी आपले मनेागत व्यक्त केले.  समारंभाचे सुत्रसंचालन विक्रम आपटे यांनी तर आभार प्रदर्शन सौ.पूजा कान्हेरे यांनी केले.  यावेळी फलटणचे ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ. बनबिहारी निमकर,श्रीमंत सुभद्राराजे निंबाळकर, दिलीपसिंह भोसले,डॉ.सौ प्राची जोशी,डॉ. अविनाश देशपांडे,श्रीमती जयश्री जोशी, डॉ.गोपाळराव जोशी,पत्रकार रवींद्र बेडकीहाळ,डॉ.सुहास जोशी,डॉ.अनील जोशी, डॉ.धुमाळ,दिवाकर कोरांटक, यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.