कर्तव्य ग्रुपमुळे अपंग सकुंडेंच्या जगन्याला मिळाली नवी दिशा

सातारा : समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या कर्तव्य सोशल ग्रुपमुळे आजवर हजारो नेत्ररुग्णांना नवी दृष्टी मिळाली तर, असंख्य दिव्यांग बांधवांना कृत्रीम अवयव मिळाल्याने त्यांचे जगणे सुसह्य झाले आहे. पानमळेवाडी ता. सातारा येथील मधुकर जगन्नाथ सकुंडे (वय 50) या दिव्यांग बांधवालाही कर्तव्य सोशल ग्रुपमुळे भक्कम आधार मिळाला असून सकुंडे यांच्या जगन्याला नवी आणि सकारात्मक दिशा मिळाली आहे.
पानमळेवाडी येथे 50 वर्षीय मधूकर सकुंडे हे कुटूंबीयांसमवेत रहात आहेत. ते जन्मताच अपंग असून त्यांना दोन्ही पाय नाहीत तर, दोन्ही हातही निकामी आहेत. कुटूंबीयांच्या आधारावर सकुंडे यांचे जीवन सुरु होते. त्यांना घरातून बाहेर ङ्गिरता येत नव्हते. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने सकुंडे हे पानटपरी चालवून कुटूंबीयांना आर्थिक हातभार लावत आहेत. दरम्यान, चालता ङ्गिरता येत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. एक दिवस कर्तव्य सोशल ग्रुपच्या कार्याची माहिती मिळाल्यानंतर सकुंडे यांचे बंधु कर्तव्य ग्रुपच्या सदस्यांना भेटले. सदस्यांनी सकुंडे यांच्या परिस्थितीची माहिती कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांना दिली.
सौ. वेदांतिकाराजे यांनी तातडीने मधुकर सकुंडे यांना तीनचाकी सायकल देण्याचा निर्णय घेतला. यानंतर सौ. वेदांतिकाराजे यांच्या हस्ते सकुंडे यांना सायकल भेट देण्यात आली. आपल्याला पाय नाहीत पण, चाके मिळाली. आता आपणही जनमाणसात मिसळू शकतो, ङ्गिरू शकतो हे स्वप्न सत्यात उतरल्याने मधुकर सकुंडे यांचा आनंद गगनात मावत नव्हता. सकुंडे कुटूंबीयांनी सौ. वेदांतिकराजे यांचे आभार मानले. यावेळी कर्तव्य सोशल ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. परिस्थिती अनुकूल नसतानाही मधूकर सकुंडे हे पानटपरी चालवून कुटूंबाला हातभार लावत आहेत. या दिव्यांग बांधवाला कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून तीनचाकी सायकल देण्यात आली असून त्यांचे जगणे सुसह्य करता आले, याचे मनस्वी समाधान ग्रुपला वाटत असल्याची प्रतिक्रीया सौ. वेदांतिकराजे यांनी यावेळी दिली.