किल्ले वर्धनगडला गतवैभव प्राप्त होणार : अर्जून मोहीते

पुसेगाव ः किल्ले वर्धनगडवर मोठ्या प्रमाणात कामे होत असून वर्धनगड गावही सातारा जिल्ह्यात विकासाचे आदर्श मॉडेल म्हणुन पुढे येत आहे. गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात निधी वर्धनगड व परीसरात वळला आहे. हुतात्मा स्मारक सुशोभीकरण,दत्त मंदिर उभारणी बरोबरच वर्धनगडला पर्यटण स्थळ म्हणून दर्जा प्राप्त झाल्याने मोठ्या प्रमाणात वर्धनगड गड संवर्धन मोहीम राबवली जाणार असल्याने किल्ले वर्धनगडला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी   प्रयत्न करणार आहे असे मत शिवसेना नेते आणि जिल्हा नियोजन सदस्य  सरपंच अर्जून मोहीते  यांनी व्यक्त केले.
सरपंच तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अर्जुन मोहीते यांच्या प्रयत्नातुन आणि शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या हुतात्मा स्मारक, दत्त मंदीर सुशोभिकरण याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले किल्ले वर्धनगडाला ऐतिहासिक महत्व असुन जर या गडा बरोबर गावाचा विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असुन त्याचबरोबर पर्यटन व्यवसायाही वाढीला चांगली मदत होणार आहे.गावामध्ये सुसज्ज बगिचा,दवाखना,व्यायाम शाळा या बरोबर सर्वच योजनांचा पुरेपुर वापर करणार आहे. गावातील अंतर्गत रस्त्याबरोबर अनेक सोयी सुविधांसाठी  सर्वांचेच  कायम सहकार्य असते लवकरच किल्ले वर्धनगडवर पर्यटन विकासा निधीतून कामे चालू होत आहेत . बानगुडे सरांचे किल्ले वर्धनगडवर खास प्रेम असल्याने मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागत असुन भविष्यातही त्यांना कायम सहकार्य राहील.
श्री दत्त मंदिर लोकार्पण आणि दत्त मुर्ती प्रतिष्ठापणा प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते झाले तर यावेळी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी बंडातात्या कराडकर यांचे किर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला
यावेळी वर्धनगड  परिसरातील शंभर गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी सपोनि विश्वजीत घोडके,शिवव्याख्याते विशाल सुर्यवंशी याबनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
यावेळी शिक्षक वर्ग,पालक,विद्यार्थी  मोठ्यासंख्येने उपस्थित होते. हुसेन शिकलगार,उपसरपंच अर्जुन कुंभार,तुकाराम चव्हाण अविनाश पाचांगणे,पांढुरंग फडतरे,भरत मोहीते,  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.