कोयना प्रकल्पग्रस्तांची होळी आंदोलन स्थळी ; शासनाच्या नावाने केली बोंबाबोंब ; आंदोलनाचा पाचवा दिवस ; अधिकारी वर्गाची प्रकल्प ग्रस्तांकडे पाठ

पाटण:- महाराष्ट्राची अर्थवाहिनी कोयना प्रकल्प असला तरी जेवढे मोठे धरण तेवढ्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्राची तहान आणि अंधार दूर करणारे च आज तहानलेले आणि अंधारात आहेत. गेले पाच दिवस कोयना प्रकल्पग्रस्त कोयनानगर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने आंदोलनास बसले आहेत विशेष म्हणजे होळीचा सण असून देखील या सणात सुद्धा प्रकल्प ग्रस्त आंदोलन स्थळी हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत. आंदोलन स्थळी या प्रकल्प ग्रस्तांनी होळी साजरी करून शासनाच्या नावाने बोंब केली. आज पाचव्या दिवशी होळीच्या सनातील दुसरा दिवस फड शिंपनी हा कार्यक्रम देखील महिलांनी होळीची गाणी गात साजरा केला. आणि मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा ,धरण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे यांसारख्या घोषणा दिल्या. कोयना प्रकल्प ग्रस्तांनचा हा आक्रोश शासन कधी पाहणार आणि या प्रकल्प ग्रस्तांची दयनीय अवस्था कधी सुधारणार. अशी अवस्था निर्माण झाली असून हे आंदोलन आता कोणत्याही क्षणी चिघळण्याच्या मार्गावर आहे.
गेल्या ६४ वर्षात शासनाला कोयना प्रकल्प ग्रस्तांकडे लक्ष द्यायला मुहूर्त सापडला नाही. आता हा मुहूर्त कधी सापडणार. सातारा जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी आणि पुनर्वसन अधिकारी यांनी जिल्हा स्थरावर कोयनेच्या आंदोलनावर काय काय केले हे आंदोलन स्थळी येऊन सांगावे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प ग्रस्त एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे . आत्ता मात्र शेंडी तुटो अथवा पारंबी या इराध्याने कोयना प्रकल्प आंदोलनात सहभागी झाले आहेत. आणि शासन म्हणजे मुख्यमंत्री स्वतः येऊन कोयना प्रकल्प ग्रस्तांना मागण्या मान्य केल्याचे लेखी अस्वासन देत नाहीत तो प्रयन्त हे प्रकल्प ग्रस्त उठणार नाहीत.
या आंदोलनात होळीच्या सणात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे आंदोलकांनी आयोजन करून शासनाच्या विरोधात बोंबाबोंब सुरू ठेवली. यावेळी चैतन्य दळवी ,महेश शेलार ,सचिन कदम ,दाजी पाटील ,श्रीपती माने डी डी कदम शिवाजी साळुंखे संभाजी चाळके यांच्यासह हजारो प्रकल्प ग्रस्त उपस्थित होते.

कोयना प्रकल्प ग्रस्तांचे गेल्या पाच दिवसांपासून कोयना येथे हक्काच्या मांगण्यासाठी आंदोलन सुरू आहे. या पाच दिवसात राज्य अथवा जिल्हास्तरावरुन कोणताही अधिकारी आंदोलन ठिकाणी फिरकला नाही. अथवा त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. त्यांचा निषेधार्थ देखील आंदोलकांनी हात उंचावून होळीची बोंब ठोकली.