लोकप्रतिनिधिंनी आंदोलनास नुसता पाठींबा व भेटी देण्यास येवू नये ; कोयना धरणग्रस्तांचे आंदोलन ८ व्या दिवशी शांततेच्या मार्गाने सुरू – डॉ. भारत पाटणकर

पाटण:- कोयना धरण ग्रस्तांचे आंदोलन गेले आठ दिवस कोयना येथे शांततेच्या मार्गाने सुरू आहे. या आंदोलनाचा काहीच परिणाम झाला नाही. अस म्हणता येणार नाही. या आंदोलनामुळे तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर धरणग्रस्तांचे न सापडणारे महत्त्वाचे कागदपत्र सापडू लागली आहेत. याची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे. या पडताळणीत खरे धरणग्रस्त प्रकल्प ग्रस्त समोर येणार आहेत. या आंदोलना संदर्भात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा झाली असून. लवकरच आंदोलना संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचा दिवस निश्चित होईल. आंदोलन यशस्वी होत असल्याचे पाहून लोकप्रतिनिधी आंदोलनाला पाठिंबा द्यायची घाई करत आहेत. नुसता पाठींबा द्यायला आणि भेटी घ्यायला कोणी येवू नये. असे श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी पाटण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. भारत पाटणकर पुढे म्हणाले गेली ४८ वर्ष कष्टकरी, धरणग्रस्त, प्रकल्प ग्रस्त यांच्या ज्ञ्यायहक्कासाठी लढा देतोय. कोयनेचे गेली आठ दिवस सुरु असलेलं आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे. आठ दिवस म्हणजे आंदोलनाचा मोठा कालावधी नाही. या आठदिवसात तालुका आणि जिल्हा पातळीवर गतीमान हालचाली सुरू आहेत. यामुळे कोयना धरण ग्रस्तांचे न सापडणारी कागदपत्रे सापडू लागली आहेत. या कागदपत्रांची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू असून ख-या प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळेल. या आंदोलनाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या सोबत होणा-या बैठकीत संबधित खात्याचे मंत्री, सचिव, अधिकारी यांचा समावेश असेल.
कोयना धरणाची आणखी उंची वाढविण्याचा विचारात शासन आहे. यामुळे पाणलोट क्षेत्राबाहेर असलेल्या व संपादीत झालेल्या अनेक जमिनी पुन्हा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जाणार आहेत. पाणलोट क्षेत्राच्या बाहेर शिल्लक राहणाऱ्या जमिनी मुळ मालकासह धरणग्रस्तांना परत देण्यात याव्यात. पाणलोट क्षेत्रालगत असणा-या धरणग्रस्त शेतकऱ्यांना धरणातील पाणी व विजपुरवठा मोफत देण्याची मागणी केली आहे. २७ हजार खातेदार असलेल्या कोयना प्रकल्पाचे स्पेशल कामकाज करणारे कोयना व सातारा येथे स्पेशल वालरूम असावे. आणि येथिल अभयारण्यतील विकास कामात स्थानिक जनतेचे ज्ञान पर्यावरण वाढीसाठी वापरावे. असे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.