राज्यातील कुंभार समाज महासंघाच्यावतीने ५ मार्च रोजी विधान भवनावर महामोर्चा

 

मायणी : (सतीश डोंगरे )राज्यातील कुंभार समाज महासंघाच्या वतीने ५ मार्च  रोजी विधान भवनावरती  आपल्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कुंभार समाज महासंघामार्फत देण्यात आली.

या महामोर्चामध्ये संत गोरोबा काका मातीकला बोर्डाची स्थापना ,’एन.टी.प्रवर्गत समावेश,तेर ढोकी जि.उस्मानाबाद या गोरोबा काकांच्या जन्मगावाला अ वर्ग तिर्थक्षेत्रदर्जा ,विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व , मातीवरील रॉयल्टी पूर्ण माफ करावी ,कुंभर समाजाला ओळखपत्र मिळावे ,माती वाहतूक व वीटभट्टी परवान्यातील जाचक अटी रद्द कराव्या ,समाजासाठी असणार्या कुंभार खाणीवरील अतिक्रमणे हटवावि, वीट मडकी व मूर्ती विक्रीसाठी ग्रामपंचायत नगरपंचायत व महानगरपालिकेमध्ये क्षेत्र राखीव ठेवावी ,६० वर्षवरील कुंभार कामगारांना मानधन व जिल्हास्तरावर विद्यार्थांना वस्तिगृह मिळावी अशा विविध मागण्या करण्यात येणार आहेत.

मोर्चासंदर्भात सातारा जिल्हा कुंभार समाजातील तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकांचे आयोजन करण्याचे आवहान सातारा जिल्हाध्यक्ष डॉ संजय कुंभार यांनी केले आहे.