Thursday, April 18, 2024
Homeठळक घडामोडीधोनीचा कर्णधार पदाचा राजीनामा

धोनीचा कर्णधार पदाचा राजीनामा

मुंबई : टीम इंडियाचा वन डे आणि टी-२०चा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

 धोनीने वन-डे, टी-२०चे कर्णधार सोडले असल्याची माहिती बीसीसीआयने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. धोनी गेल्या नऊ वर्षापासून टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. टीम क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून महेंद्र सिंह धोनी यांने चांगली कामगिरी केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला वन डे आणि टी-२०चा वर्ल्ड कप जिंकला आहे.   महेंद्रसिंग धोनी आयसीसी २००८-२००९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट वन डे खेळाडू ठरला आहे. इतके नाही तर धोनीला कसोटी व वन डे संघाचे नेतृत्त्व करण्याचा बहुमानही मिळाला. २०११ चा विश्वचषक, २००७ चा ट्वेंटी-२० विश्वचषक आणी २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी या महत्वाच्या स्पर्धांमध्ये धोनीने भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. कर्णधारपद सोडले तरी धोनी भारताच्या वन डे आणि ट्वेंटी-२० संघातून खेळत राहणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular