पाटण येथे मराठा आरक्षणाला पांठीबा देणाऱ्या सर्वांचे आभार.

पाटण:- अडीच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मराठा समाजाच्या मागणीचा विचार करुण महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनाच्या दोन्ही सभाग्रुहात मराठा आरक्षण एक मताने मंजुर करण्यात आले. या आरक्षणाला सभाग्रुहात सर्व सदस्यांनी एकमुखांनी दिलेल्या पाठींबाच्या पार्श्वभुमिवर पाटण येथे मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुका समन्वयक समिती व सखल मराठा समाजाच्या वतिने दोन्ही सभाग्रुहाचे आभार मानन्यात आले. प्रारंभी यावेळी कोपर्डी प्रकरणात बळी गेलेली मराठा भगनी तसेच मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४० मराठा बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
मराठा आरक्षण हे मराठा समाजाची सर्वात मोठी मागणी होती. मराठा आरक्षणासाठी गेली २५ वर्ष लढा सुरु होता. गेल्या अडीच वर्षात कोपर्डी बलात्कार प्रकरणा पासुन राज्यातीलच नव्हे संपुर्ण जगातील मराठा समाज ऐकवटला गेला. लाखोंच्या संख्येने ५८ मुकमोर्चे, आंदोलने मराठा समाजाने आता पर्यंत झेललीत. या आंदोवनात ४० मराठा समाज बांधवांनी आपल्या प्रणाची बाजी लावुन बलिदान दिले. तेंव्हा कुठे हे मराठा आरक्षण विधानभवनाच्या दोन्ही सभाग्रुहात एक मताने मंजुर झाले. या ४० मराठा बांधवांचे बलिदान यावेळी विसरुन चालनार नाही. हे आरक्षण विधानभवनाच्या दोन्ही सभाग्रुहात नुसते मंजूर होऊन चालणार नाही. या आरक्षणाची कायद्याची आमल बजावणी होईपर्यंत मराठा समाजाचे आंदोलन सुरुच राहणार आहे. अशा प्रतिक्रीया मराठा क्रांती मोर्चाच्या पाटण तालुका समन्वयक सदस्यांनी दिल्या. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधानभवनाच्या दोन्ही सभाग्रुहात सर्व सदस्यांनी एकमुखांनी दिलेल्या पाठींबाच्या पार्श्वभुमिवर पाटण येथे मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुका समन्वयक समिती व सखल मराठा समाजाच्या वतिने दोन्ही सभाग्रुहाचे आभार मानन्यात आले. झेंडाचौक पाटण येथे झालेल्या आभार समारंभात पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यशवंतराव जगताप, सुरेश पाटील, राजाभाऊ काळे, फत्तेसिंह पाटणकर, धर्यशिल पाटणकर, हरिष भोमकर, आयेशा सय्यद, बकाजीराव निकम, सागर माने, लक्ष्मण चव्हाण, शंकर मोहिते, विक्रम यादव, आनिल भोसले, मंगेश पाटणकर, राजेंद्र पाटणकर, जयवंतराव सुर्वे, युवराज साळुंखे, विक्रम मोहिते, राजेंद्र मोरे, कुमार साळुंखे, राहुल पवार, गणेश जाधव, आनंद मोघे आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यशवंतराव जगताप
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक
पाटण तालुका.

मराठा आरक्षण हे मराठा समाजाची सर्वात मोठी मागणी होती. मराठा आरक्षणासाठी गेली २५ वर्ष लढा सुरु होता. गेल्या अडीच वर्षात कोपर्डी बलात्कार प्रकरणा पासुन राज्यातीलच नव्हे संपुर्ण जगातील मराठा समाज ऐकवटला गेला. लाखोंच्या संख्येने ५८ मुकमोर्चे, आंदोलने मराठा समाजाने आता पर्यंत झेललीत. या आंदोवनात ४० मराठा समाज बांधवांनी आपल्या प्रणाची बाजी लावुन बलिदान दिले. तेंव्हा कुठे हे मराठा आरक्षण विधानभवनाच्या दोन्ही सभाग्रुहात एक मताने मंजुर झाले. या ४० मराठा बांधवांचे बलिदान यावेळी विसरुन चालनार नाही. हे आरक्षण विधानभवनाच्या दोन्ही सभाग्रुहात नुसते मंजूर होऊन चालणार नाही. या आरक्षणाची कायद्याची आमल बजावणी होईपर्यंत मराठा समाजाचे आंदोलन सुरुच राहणार आहे. अशी प्रतिक्रीया मराठा क्रांती मोर्चाचे पाटण तालुका समन्वयक यशवंतराव जगताप यांनी दिली.

 

सौ. शारदा शंकर मोहिते.
मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुका महिला
सयन्वयक.

मराठा समाजाने आतापर्यंत सर्व क्षेत्रातील व सर्व समाज बांधवासाठी मोठे योगदान दिले. या योगदानात मराठा समाज कधी मागे पडत गेला हे समजलेच नाही. गेल्या वीस- पंचविस वर्षा पासुन मराठा समाजाला आरक्षणाची मागणी होत होती. मात्र त्याचे स्वरुप लहान होते. मात्र कोपर्डी प्रकरणात मराठा भगनीचा गेलेला बळी हा मराठा समाजाला एकत्र करण्यास किरणीभुत ठरला. या भगिनीचे बलिदान मराठा समाजासाठी मोठे आहे. त्याच बरोबर मराठा समाजाच्या ४० बांधवांनी दिलेले बलिदान हे विसरुण चालणार नाही. मराठा समाजाच्या ऐकीमुळेच आज मराठा समाजाला आरक्षण मिळाले. हि मराठा समाजाची ऐकी कायम राहावी. अशी प्रतिक्रीया सौ. शारदा शंकर मोहिते यांनी दिली.