Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीनिष्ठेची व अर्थपूर्ण व्यवहाराची भाषा सुरेंद्र गुदगेंनी करू नये :- डॉ दिलीपराव...

निष्ठेची व अर्थपूर्ण व्यवहाराची भाषा सुरेंद्र गुदगेंनी करू नये :- डॉ दिलीपराव येळगावकर 

मायणी :-   ज्यांनी आयुष्यभर निष्ठवंतांना पायदळी तुडवले,आणि नेहमीच अर्थपुर्ण राजकारण केल .अशा गोष्टीची काविळी सुरेंद्र गुदगेंना झाल्याने त्यांना सगळं जग पिवळच दिसणार .त्यामुळे  निष्ठेची व अर्थपूर्ण व्यवहाराची भाषा सुरेंद्र गुदगेंनी आम्हाला करू नये. अशी टीका माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी सुरेंद्र गुदगे यांच्यावर केली .   ते मायणी येथे आयोजित जाहीर सभा व नूतन सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार समारंभात बोलत होते .

यावेळी पुढे बोलताना डॉ येळगावकर म्हणाले, प्रथमतः नूतन सरपंच सचिन गुदगे आणि उपसरपंच सुरज पाटील यांना मी शुभेच्छा देतो. गेल्या जि प निवडणुकीत आपल्यातीलच काही दूर झालेल्या कार्यकर्त्यांमुळेे झालेल्या निवडणुकीत आपल्या उमेदवाराचा किरकोळ मतांनी पराभव झाला,अन्यथा विरोधकांना तेव्हाच सुरेंद्र गुडगेना धुळ चारली असती. व आजची चाललेली विनाकारण लुडबुड तेव्हाच थांबली असती.

निष्ठेची भाषा आज तुम्ही करू नका. गत सरपंच महादेव यलमर यांनी आयुष्यभर संघघटनेची व स्व भाऊसाहेबांची निष्ठा वाहिली.त्यांची गत पंचवार्षिक ला सरपंच पदावर निवड झाल्यावर  फक्त यलमर यांनी चुकीच्या गोष्टीला विरोध केल्याने या चांगल्या माणसाला तुम्ही सक्तीच्या रजेवर घालवण्याचे पाप तुम्ही केले आणि निष्ठेचा शब्द तुम्ही आम्हाला सांगता आहात का?,राष्ट्रवादी रासप कांग्रेस आता पुन्हा राष्ट्रवादी पक्षबदलाची परंपरा तुमची असल्याने तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवू नये.सध्या तुम्ही राष्ट्रवादिला लाथा घालण्याचे काम सुरू केले आहे . आमदारकी निवडणूकांच्या वेळी प्रभाकर घार्गे,स्व सदाशिवराव तात्या पोळ यांचेकडून घेतलेले पैसे आधी परत करा.

यापुढे मायणीचा विकासात अडथळे आणण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा .पुन्हा असले शब्द वापरू नका. तुमचे राजकारण तुम्ही करा आमचं राजकारण आम्ही करू .यापुढे गावात रस्ते , बायपास रस्ता,पिण्याच्या पाण्याची सुविधा सह विविध शासकिय योजना येथे राबविण्यात येणार आहेत.

यावेळी नूतन सरपंच सचिनभाऊ गुदगे,उपसरपंच सुरज पाटील व मातोश्री सरुताई विकास पॅनेल चे सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य ,माजी सरपंच महादेव यलमर, माजी सदस्य व  मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी बोलताना नूतन सरपंच सचिनभाऊ म्हणाले,  दारुण झालेला पराभव स्वीकार करण्याची विरोधकांची मानसिकता नाही. काटेरी संघर्षांचा वाटेवरून मी आजवर चालत आलो असून अशा पोकळ टीकानां भिणारा हा सचिन गुदगे नाही .सर्वसामान्य मतदारांच्या पाठींब्यावर मी आजवर इथपर्यंत आलो आहे.माझ्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते ,ज्यांनी मला बळ दिले ,असे मोठंया मनाचे डॉ दिलीपराव येळगावकर सर्व पदाधिकारी यांचा मी ऋणी आहे. लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष कारावा लागला तरी मी मागे हटणार  नाही.मायणीच्या सर्वांगीण विकासाचा माझा ध्यास असून  संघटनेच्या विरोधात असणारे लोक असतील ,मला मतदान कोणी केले,कोणी केले नाही याचा विचार मी करणार नसून गावचा सरपंच या नात्याने संपूर्ण गावाला सोबत घेऊन गावा बरोबरच वाडया वस्त्याचा काया पालाट करण्यावर माझा भर असणार आहे .

यावेळी उपसरपंच अँड सुरज पाटील बोलताना म्हणाले  ,माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला डॉ येळगावकरं व संघटनेने मनाचा मोठेपणा दाखवून उपसरपंचपदी निवड केली मी सर्वांचा आभार मानतो.मायणीचा सर्वांगीण विकासा साठी सरपंच सचिन गुदगे यांच्या बरोबर व सदस्यांना सोबत घेऊन गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध असणार आहे.    यानंतर मोहन दगडे,जनार्दन देशमुख,राजेंद्र ठोंबरे,यांनी आपली मनोगते व्यक्त केले .यावेळी माजी सरपंच आप्पासाहेब देशमुख,अर्बन बँकेचे माजी चेअरमन शिवाजी पाटील,वडूज कृषी बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ माळी, यशोदीप सोसायटीचे चेअरमन संजय गुदगे,व्हा चेअरमन राजाराम कचरे,मकरंद तोरो यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.  यावेळी प्रास्ताविक राजाराम कचरे तर आभार सुरेश वरुडे यांनी मानले .

या जाहीर सभेत सरपंच सचिन गुदगे यांचे भाषण चालू असतानाच डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या मोबाईलवर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा फोन आला व त्यांनी मोबाईलवरून मार्गदर्शन करताना ” भाजप पक्षाचे सरपंच उपसरपंच निवडून दिल्याबद्दल सर्व मायणीकरांचे आभार .नुकतेच टेंभूयोजनेसाठी ९कोटी मंजूर केले असून लवकरच हे काम मार्गी लागेल. असे सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular