एकीमुळे गावाचा विकास होतो हे केळोली गावाने दाखवून दिले : आ. शंभूराज देसाई

सातारा : गावची सत्ता एकी करुन विरोधकांच्या ताब्यातून काढून घेत चांगल्या विचारांच्या ताब्यात घेतल्यामुळे आणि गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकी दाखविल्यामुळे गावचा विकास कसा साध्य करुन घेता येतो हे चाफळ भागातील केळोली गावाने दाखवून दिले आहे. केळोली गावाचा आदर्श मतदारसंघातील इतर गावांनीही घ्यावा असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
केळोली ता.पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाई यांच्या निधीतुन उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचे उदघाटन व गावाला जोडणारा रस्ता याचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते घेण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत बँकेचे चेअरमन डॉ. मिलींद पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन राजाराम पाटील,जिल्हा परिषद माजी सदस्य दत्तात्रय वेल्हाळ, डी.वाय पाटील, माजी संचालक बी.आर.पाटील,प्रकाश नेवगे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष व शंभूराज युवा संघटना अध्यक्ष भरत साळुंखे, उपाध्यक्ष अभिजीत पाटील, शिवदौलत बँक संचालक चंद्रकांत पाटील,संरपच सौ.युमुना मोरे,उपसरपंच संतोष साळुंखे,सदस्य वंदना सुतार,उषा काकडे,दिनकर साळुंखे,श्रीरंग साळुंखे,परशुराम मोरे, राजाराम सुतार,दिलीप सपकाळ,शंकर मोरे,बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी.माने,शाखा अभियंता घुटे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, दोन वर्षापुर्वी केळोली गावची ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि अनेक वर्षे विरोधकांच्या ताब्यात असणारी केळोली ग्रामपंचायतीत कोणत्याही परिस्थितीत सत्तातंर करायचे ही भूमिका संपुर्ण गावाने एकी करुन घेतली आणि विरोधकांच्या ताब्यात असणारी ग्रामपंचायत चांगल्या विचारांच्या ताब्यात देण्याचे काम गावातील ग्रामस्थांनी केले. ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्काराला ग्रामस्थांनी मला बोलविले.आणि आता या सदस्यांना बसण्याकरीता चांगली ग्रामपंचायत बांधून दया अशी आग्रही मागणी माझेकडे केली.ग्रामस्थांच्या मागणीच्या दुस-याच वर्षी या ग्रामपंचायतीच्या चांगल्या उभारलेल्या वास्तूचे माझेहस्ते उदघाटन होत आहे ही आनंदाची बाब आहे. गावाच्या दर्शनी उभारलेली ही वास्तू ही इतर गांवाना आदर्श देणारी वास्तू आहे. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार आपण गावाला जोडणारा संपुर्ण रस्ता, गावाच्या वरील बाजूस लघु पाटबंधारे विभागाकडून बंधारा बांधण्याचे काम केले. एका वर्षात गावामध्ये सुमारे 55 लक्ष रुपयांचा निधी आपण ग्रामस्थांना मिळवून दिला त्या निधीचे कामे गांवामध्ये आज पुर्ण झालेली पहावयास मिळत आहेत. असे सांगून ते म्हणाले, अशाप्रकारची कामे या विभागातील प्रत्येक गांवामध्ये पुर्ण झाली आहेत तर काही सुरु आहेत. तरीही आपल्या विरोधकांना विकासाची कुठे कामे सुरु आहेत असा प्रश्न पडला आहे. आपण केलेली विकासकामे ही विरोधकांचे डोळे दिपवणारी असल्यामुळेच कांमे दिसत असूनही ती दिसत नसल्याचा डांगोरा विरोधकांकडून पिटला जात आहे. विरोधकाकडे आज देण्यासारखे काहीच नाही त्यामुळे जनतेमध्ये बुध्दीभेद कसा निर्माण करायचा हाच त्यांचा प्रयत्न राहिला आहे आणि भविष्यातही राहणार आहे त्यामुळे गावांनी आणि गावांतील ग्रामस्थांनी जागरुक रहाणे गरजेचे आहे. विकास नेमका कोण करतय हे तालुक्यातील जनता उघडया डोळयांनी पहात आहे. आता केळोली गावाचेचे उदाहरण घ्या विरोधकांच्या ताब्यात ग्रामपंचायतीची सत्ता होती तेव्हा ग्रामपंचायतीच्या इमारतीची काय अवस्था होती आणि आता ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्यानंतर ग्रामपंचायतीची काय अवस्था आहे. हा फरक आहे विकासाचा दृष्टीकोन असल्याचा.मी गेल्या 30 वर्षात विकासाच्या मुद्दायावरच जनतेच्या दारात निवडणूकांच्या काळात मते मागायला गेलो आणि विकासाचाच मुद्दा घेवून भविष्यातही मी मतदारांपुढे जाणार आहे. माझेप्रमाणे विरोधक कोणता मुद्दा घेवून मतदारांच्या दारात येणार आहेत याचा विचार मतदारसंघातील जनतेने करावा आणि गावाच्या विकासाची जबाबदारी घेणा-या नेत्याच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत शंकर मोरे यांनी करुन आभार मानले.