नगरपालिका निवडणूकीचे सर्व अधिकार भाजपा सातारा कोअर कमिटीला

सातारा : भाजपा सातारा शहरची गेल्या 2 दिवसांपूर्वीची महत्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सातारा नगरपालिकेतील सर्व निर्णयासाठी कोअर कमिटी जाहीर करण्यात येणार होती. ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत हॉटेल प्रिती एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी सातारा शहर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आज दि.20 रोजी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यामध्ये कोअर कमिटीमध्ये सातारा शहराध्यक्ष सुनिल काळेकर, दत्ताजी थोरात, दीपक पवार यांचा समावेश करण्यात आला. या कोअर कमिटीला सातारा शहर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार घेण्याचे अधिकार देण्यात आले.
या बैठकीप्रसंगी शहरातील अनेक मात्तबरांनी प्रवेश केला. यामधये संजय (पप्पू) लेवे, सागर पावशे, विकास धुमाळ, यांचा जाहीर प्रवेश ना. चंद्रकांत दादा पाटील आणि कांताताई नलावडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. याप्रसंगी शहरातील प्रभाक ग्र. 11, 14 व 16 याठिक़ाणी जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या काही दिवसातच शहरातील अनेक मातब्बर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्री यावेळी व्यक्त करण्यात आली. लवकरच नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करण्यात येणार असून येणार्‍या काळात भारतीय जनता पार्टी सातारा शहरात कडवे आव्हान उभे करणार असल्याचे मत शहराध्यक्ष श्री. काळेकर यांनी व्यक्त केले. या बैठक प्रसंगी शहरातील अनेक इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या बैठकी प्रसंगी नगरसेविका सुवर्णाताई पाटील, किशोर गोडबोले, जिल्हा सरचिटणीस विजय काटवटे, जिल्हा उपाध्यक्ष, रवींद्र पवार, शहर सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, जयदिप ठुसे, शहर उपाध्यक्ष आप्पा कोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलवडे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप मेळाट, युवा मोर्चा शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, धनंजय जांभळे, तालुका उपाध्यक्ष (ओबीसी) महेंद्र कदम, शहर अध्यक्ष (ओबीसी) सुर्यकांत पावस्कर, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत सासवडे, शहराध्यक्ष (बी.सी.) मिलींद कदम, महिला आघाडी शहराध्यक्ष निर्मला पाटील, महिला आघाडी उपाध्यक्ष जयश्री काळेकर, सुजाता कोल्हाटकर, सिद्धी पवार, धिरज घाडगे यांची उपस्थिती होती.