नाव प्रकरणी संशयित आरोपी संतोष विचारे पोलिस पाटील पदावरुन निलंबित

 

पाटण:- पाटण तालुक्यातील कोयना विभागातील नाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या नाव गावातीलच पोलीस पाटील व संशयित आरोपी संतोष दाजी विचारे यास अखेर १९६७ मधील कलम ११ नुसार पोलिस पाटील या पदावरुन निलंबित केले आहे. हि कारवाई उपविभागिय दंडाधिकारी उपविभाग पाटण श्रीरंग तांबे यांनी केली असून निलंबन केलेल्याचे आदेश माहितीसाठी प्रत जिल्हाधिकारी सातारा, उपविभागिय पोलिस अधिकारी पाटण, कार्यकारी दंडाधिकारी तहसिलदार पाटण, सहायक पोलिस निरीक्षक पाटण, सहायक पोलिस निरीक्षक कोयनानगर यांना देण्यात आल्या आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी संतोष दाजी विचारे हा पोलिस पाटील या पदावर कार्यरत आसताना त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने त्याचेवर फौजदारी गुन्हा दाखल आसुन त्याला सुरवातीस पोलिस कस्टडी व तद्दनंतर न्यायालयीन कस्टडी दिलेली आसुन तो सद्या कळंबा काराग्रुह कोल्हापुर येथे कैदेत आहे. या फौजदारी खटल्याची न्याय चौकशी होईपर्यंत महाराष्ट्र ग्रामपोलिस अधिनियम १९६७ मधील नियम ११ नुसार अन्वये प्राप्त अधिकारानुसार संतोष दाजी विचारे पोलिस पाटील नाव ता. पाटण याला पोलिस पाटील या पदावरुन तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. असे आदेश देऊन उपविभागिय दंडाधिकारी उपविभाग पाटण श्रीरंग तांबे यांनी या आदेशाच्या माहितीसाठी प्रती जिल्हाधिकारी सातारा, उपविभागिय पोलिस अधिकारी पाटण, कार्यकारी दंडाधिकारी तहसिलदार पाटण, सहायक पोलिस निरीक्षक पाटण, सहायक पोलिस निरीक्षक कोयनानगर आणि संशयीत आरोपी संतोष दाजी विचारे यांना देण्यात आल्या आहेत.