“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.

पाटण:- राज्य शासनाच्या “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेत जिथे-जिथे छोटी धरणे, तलाव आहेत. त्या गावातील शेतकरी बांधवानी पुढे येऊन अशा धरण-तलावातील गाळ काढुन शेतात वापरल्यास शेतकऱ्यांच्या सुपीक शेतीत वाढ होत असुन या तलाव-धरणांचा वर्षाकाठी पाणी साठा देखिल वाढत आहे. यामुळे या गावातील दुष्काळी परस्थिती कमी होऊन पाण्याचा प्रश्न मिठण्यास मदत होत आहे. “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेत जास्ती-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन सम्रुध्द शेती सम्रुध्द गाव करण्यास प्रयत्न करावा. असे अहवान प्रांत आधिकारी श्रीरंग तांबे यांनी उदवणे ता. पाटण येथील गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ करताना केले.

यावेळी लघु पाटबंधाऱ्याचे अविनाश पदमाळे, जे.व्ही बंगे, उदवणेचे सरपंच विजय सांळुखे,उपसरपंच रामचंद्र सांळुखे, रुवलेचे सरपंच हणमंतराव सांळुखे, अनुलोमचे जिल्हा प्रमुख शरद सांळुखे, तालुका प्रमुख किशोर प्रभाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रांतआधिकारी श्रीरंग तांबे यांनी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेसाठी शासन सर्वतोपरी मदत करत असुन जास्ती-जास्त शेतकऱ्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. असे सांगितले. दरम्यान उदवणे ग्रामस्थांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक बांधलकी जोपासत प्रांतआधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण केले.
शासनाच्या या योजनेत सर्व गावकरी सहभागी झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी पाझर तलावातील सुपिक, शेतीउपयुक्त गाळ शेतात नेला. त्यामुळे शासनाच्या या योजनेचे सर्व गावामध्ये आणि परिसरामध्ये कौतुक झाले. अनुलोमचे प्रतिनिधी किशोर प्रभाळे यांनी सरकारच्या अनेक समाज उपयोगी योजनांची माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना दिली. यावेळी उज्वला सांळुखे, प्रेमाताई सांळुखे, रुपा सांळुखे, हिंदुराव सांळुखे, बाबुराव सांळुखे, रमेश सांळुखे, बाबासाहेब शिर्के, विलास सांळुखे यांच्यासह ग्रामस्थ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.