राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला पदाधिकारी यांचा महिलादिनी मूक निदर्शने करण्यास नकार

सातारा ः सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला पदाधिकारी यांनी नियोजन केले असताना याच दिवशी सकाळी सातारा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर भाजप-सेना राज्य सरकार सत्तेवर असल्याने एक दिवस मूक निदर्शने करण्याचे आवाहन केले होते पण, त्याला काही महिला पदाधिकारी व कार्यकर्ती यांनी नकार दिला आहे.त्यामुळे महिला दिनी राष्ट्रवादीचे निदर्शने केली जाणार का?याकडे लक्ष वेधले गेले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य आहे. त्यामुळे या पक्षाच्या आंदोलनाची नोंद घ्यावी लागते. सध्या विधिमंडळ सदस्यांचे विधानभवन, मुबंई येथे उन्हाळी हंगामातील अधिवेशन सुरू आहे. अशा वेळी राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्ती नी प्रत्येक ठिकाणी जाऊन महिलांच्या प्रश्नाबाबत एक दिवस मूक निदर्शने केली पाहिजे असे राष्ट्रवादी नेत्यांनी ठरवले आहे. तशा सूचना देण्यात आल्या होत्या. पण, महिला दिनाचा सर्वत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महिलांनी शब्द दिला आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून पक्षाचे नेते याचा आदेश मानण्यात येतो. त्याची कदर म्हणून अशा महिलांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे ही अपेक्षा असते. पण, अनेकदा सामान्य महिलांना डावलून प्रस्थापितांना व आर्थिक स्थिती चांगली असण्यार्‍या महिलांना संधी उपलब्ध करुन दिली आहे. या महिला नेत्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. पक्षाच्या साध्या मेळाव्याला येत नाहीत. महत्वाच्या पदावर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांना संधी मिळाली त्यांनीच पक्षाशी बंडखोरी करून पक्षाला अडचणीत आणले आहे. असा ही आरोप केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही महिलांनी मूक निदर्शने करण्यास पक्ष नेत्यांना स्पष्टपणे नकार दिल्याचे खात्रीशीर वृत्त समजले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत मोठी गटबाजी आहे. त्यातून राज्य व केंद्रात सत्ता नसल्याने काही महिला कार्यकर्ती पक्षाच्या दृढीकरण भूमिकेवाबत साशंकता व्यक्त करीत आहेत. त्यामुळे एकेकाळी सातारा जिल्हात अधिराज्य गाजविणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे बोलले जात आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये पक्षभेद विसरून महिलांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय असेल असा विश्वास महिला वर्ग व्यक्त करीत आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीचा इन्कार केला आहे. सातारा जिल्हात राष्ट्रवादीचेच प्राबल्य असल्याचा ही दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला जिल्ह्याध्यक्ष सौ समिन्द्रा जाधव, कार्यध्यक्ष सौ जयश्री पाटील व मान्यवर महिलांनी केला आहे