विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचे सातारा विकास आघाडीचे षड्.यंत्र ; विरोधी पक्षनेते अशोक मोने यांचा आरोप ; दहशतीच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार 

सातारा : सातारा नगरपालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीने नगर विकास आघाडी व भाजप या विरोधी नगरसेवकांच्या मागण्यांची राजकीय मुस्कटदाबी करण्याचे धोरण गेल्या एक वर्षापासून राबवले आहे. विषय पत्रिकेव र विरोधकांचे विषय डावलणे आणि वादग्रस्त विषय अजेंड्यावर आणून गैरमार्गाने आर्थिक लाभ मिळवणे ही सत्ताधार्‍यांची मानसिकता झाली आहे. शिर्के शाळा मैदानाच्या सुशोभिकरणासाठी वॉर्ड फंडातून मी स्वतः दहा लाख रूपये दिलेले असताना पुन्हा रस्ते विकास अनुदान योजनेचे पंधरा लाख रूपये पळवण्यात आले. पालिकेच्या इतिहासात इतक्या खालच्या थराला कधीच कारभार गेला नव्हता. नगरसेवकांना धड त्यांचे विषय स विस्तरपणे मांडून दिले जात नाहीत आणि त्याला विरोध करून उध्दटपणे सभा सोडून जाण्याचे प्रकार साविआ करत आहे. या सर्व प्रकरणांच्या विरोधात आपण रितसर न्यायालयात खाजगी खटला दाखल करणार असल्याचा इशारा विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी अमोल मोहिते, रविंद्र ढोणे, शकील बागवान भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. 
पालिकेच्या सभागृहात झालेल्या गोंधळानंतर विरोधी नगरसेवकांनी कमिटी हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन सातारा विकास आघाडीच्या या वर्तनाचा निषेध केला. अशोक मोने पुढे म्हणाले, दि. 28 मे रोजी झालेली सभा सातारा विकास आघाडीने बहुमताच्या जोरावर अत्यंत नियमबाह्य पध्दतीने गुंडाळली आहे. सत्ताधारी हम करे सौ कायदा या आविरभावात वावरत असून विरोधकांची कोणतीही कामे होऊ द्यायची नाहित या तयारीत आहेत. जर आमची कामे होणारच नसतील तर नगरपालिकेत येऊन फायदा काय? आपली बाजू मांडण्याच्या अधिकाराला सत्ताधारी बहुमताच्या जोरावर दाबून टाकतात. त्यामुळे आम्ही वार्डात नागरिकांना काय उत्तरे द्यायची हे वर्तन योग्य नाही. उध्दटपणे सभेच्या कामकाजात विरोध करायचा आणि राजकीय हेतून विरोधकांचे विषय डावलायचे यामध्ये साविआला स्वारस्य आहे. अद्यापही सातारा पालिकेचे बजेट मंजुर नसताना आ र्थिक लाभाचे लाखो रूपयांचे विषय गैरमार्गाने अजेंड्यावर आणले जातात. गुरूवार पेठेतील शिर्के शाळा मैदानाची देखभाल दुरूस्ती हे प्रकरण गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे. या अजेंड्यावर पंधरा लाख रूपये मी स्वतः मनोमिलनाच्या काळात वॉर्ड फंडातून दिले आहेत. असे असताना याच मैदानाच्या दुरूस्तीसाठी शिर्षबदलून हीच रक्कम रस्ते विकास अनुदानाअंतर्गत दाखवण्यात आले आहेत. म्हणजेच सातारकरांची चक्क दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. नगरसेविका सुजाता राजेमहाडिक आणि त्यांच्या ठेकेदार कंपूला नगरपालिकेकडून फुकट पोसण्याचे उद्योग सुरू आहेत. क्रीडांगणाची संरक्षक भिंत 63 लाखाची तर बॅडमिंटन हॉल 15 /लाखांचा आहे. 12 वा वित्त आयोग आमदार व खासदार फंडातून या मैदानावर अडीच कोट रूपये खर्च झाला आहे. म्हणजेच हे प्रकरण संबंधितांचे चराऊ कुरण बनले आहे. सातारकरांच्या पैशातून जर कोणाची तुंबडी भरली जात असेल तर, त्याला आमचा सक्त विरोध राहिल. सातारा विकास आघाडीच्या या भ्रष्टाचाराची पोलखोल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा अशोक मोने यांनी देत कायदेशीर लढाई लढणार असल्याचे स्पष्ट केले. गोडोलीतील महाविद्यालय परिसरातील पोलिस चौकीचे काम एका पडेल वकीलाच्या दबावातून बंद पाडण्यात आले. राजकीय दबाव टाकण्याची सातारा विकास आघाडीच खासियतच आहे. असा आरोप शेखर मोरे यांनी केला. तसेच अनेक प्रकरणांमध्ये जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करूनही कोणत्याच प्रकरणाचा निकाल स्पष्टपणे दिला जात नाही. त्यांच्यावरही खासदारांचा राजकीय दबाव असल्याची टोलेबाजी अशोक मोने यांनी केली.