40 शून्यचा इतिहास घडवणार अन्यथा खासदारकीचा राजीनामा : खा. उदयनराजे

सातारा : निवडणुका आल्या की, त्याच लोकांना संधी द्यायची. सर्वसामान्य लोकांनी मोठं व्हायचं नाही का? का मीच पाहिजे खासदार, आमदार, अध्यक्ष असं कुठ होतं का? लोकांनी आम्हाला निवडून दिल आहे. त्यांच्यासाठी काही मागीतल हे आमच चुकल का? एकचं सांगतो कोणी काहीही म्हणो या सातारा निवडणूकीत 40 शुन्य करून पुन्हा इतिहास घडविणार आहे. असे जर झाले नाहीतर खासदारकीचा राजीनामा देईन असा विश्‍वास खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
012
सातारा विकास आघाडीच्या 40 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी खा. उदयनराजे भोसले मिरवणुकीने पालिकेत आले होते. अर्ज दाखल करून झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी आडमुठेपणा केला असता तर 22 महिने जेल बसावे लागले नसते. हे कोणामुळे घडलं हे जनतेला सर्वश्रुत आहे. मी आमच्या काकांवर नित्यंत प्रेम करतो. ते सुध्दा वेदांतिकाराजे यांचे नाव न घेता त्यांचा अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरायला आहेत. त्यांना डावलून मी निर्णय घेतला आहे. तत्व तत्व असतं, वाटेल त्या परिस्थितीत मोडीन पण तत्वाशी तडजोड करणार नाही. कोणाला उमेदवारी अर्ज भरायचे ते भरून द्या. असे लुंगेसुंग्यांना विचारत नाही. एवढी जर टोकाची भूमिका घ्यायची असेल तर विचार करा मी 17 लाख मतदारांमध्ये खेळतो. आमदार फक्त अडीच लाख मताचे आहेत, याचे गणित करा.
दोघांनमधील संघर्षाचे नेमके कारण काय यावर छेडले असता खा. उदयनराजे म्हणाले संघर्ष हा बरोबरींच्या लोकांच्याबरोबर केला जातो. राजघराणं हे राजघराणं आहे. पाच वर्षात आपण कामांचे कसे मुल्यमापन करणार असा प्रश्‍न केला असता ते म्हणाले, कामाचे मुल्यमापन करायचे झाले तर वेळ पुरणार नाही. आमचे लाडके बंधूराज आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी एक कुठली योजना आणली त्यांनी सांगावे असे सांगूण खा. उदयनराजे म्हणाले, माझा दृष्टीकोन व्यापक असतो, मी संकुचित बुध्दीचा नाही. पालिकेत भ्र्रष्टाचार कोणी केला मला माहित नाही. याचं उत्तर जनता मतपेटीतून देईल यावर अधिक बोलून मला माझी उंची कमी करायची नाही. देवा शपथ सांगतो, ङ्गविष यू ऑल दी बेस्टफ सातारकरांना एकच सांगतो, जे केलं त्याची पोचं पावती नाही मिळाली तसेच नगराध्यक्षांना मतदान झाले नाही तर अनर्थ होईल.

 

मनोमिलनात खडा पडला काय असा विचारला असता खा. उदयनराजे म्हणाले, खडा कुठे पडला,  मनोमिलन आहे. पण तत्वाशी अजिबात नाही. मी स्वत: उमेदवार असलो तरी तडजोड करीत नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर राजघराणं दुभांगलं या प्रश्‍नाला उत्तर देताना खा. उदयनराजे म्हणाले, मराठा क्रांती मोर्चा ही संस्कृती आहे. सातार्‍यात पुन्हा एकदा ग्लोबेल नितीचे वारे वाहू लागलं आहे. ग्लोबेल वैगेरे असं काही नाही परिस्थिती सर्व काही सांगेल. शत्रुचा शत्रु म्हणजे माझा मित्र असा माणनार्‍यांपैकी मी नाही. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. ङ्गकाय बाय सांगू कसंगं सांगू, मलाच माझी वाटे लाजफ अशी अवस्था झाली आहे. एक बार मैने कमेंटमेंट करदी तो मै खुदकी भी नही सुनता अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रया व्यक्त केली.