कर्नल संतोष महाडिक यांच्या नावाने झळकणार सैनिक स्कुलचे आउट डोअर स्टेडियम

सातारा : सातारा येथील सैनिक स्कूलच्या काही माजी विद्यार्थी व विद्यमान कर्नल, मेजर मित्रांच्या मित्र प्रेमातून वीर मरण प्राप्त झालेले कशहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मृतींना उजाळा देणारा अनोखा सोहळा सातारा येथे संपन्न झाला. कर्नल संतोष महाडिक यांच्या जीवनाची माहिती पुढील काळात शिकणार्‍या सर्व  स्कुलच्या विद्यार्थ्यांना व्हावी या उद्दात हेतूने सैनिक स्कुलच्या आउट डोअर स्टेडियमला कर्नल संतोष महाडिक यांचे नाव देण्यात आले.यावेळी  सातारा येथील सैनिक स्कुलच्या उपप्राचार्या कर्नल राजबाला वरीष्ट अकिारी रवी सुर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी जे. बी. माने, संतोश महाडिक यांचे स्कुल मेट व सध्याचे वरीष्ठ मिल्ट्री अधिकारी सुदान येथील कर्नल प्रशोत पाटील, गांदी धाम येथील कर्नल प्रवीण गणोरकर, भोपाळ येथील कर्नल गिरी कोल्हे, दिल्ली येथील कर्नल केदार कदम, ग्रुप कॅप्टन अरविंद महाडिक दिल्ली, कर्नंल शशीकांत वाघमोडे आसाम आदी मान्यवर हजर होते. कर्नल संतोष महाडिक यांच्या मातोश्री श्रीमती कालिंदा मधुकर घोरपडे यांया हस्ते फीत कापुन आणि कानशीलेचे अनावरण करुन हा कायंक्रम संपन्न झाला.
 यावेळी  बोलतान  उपप्राचार्या कर्नल राजबाला म्हणाल्या की, सातार्‍याचे सुपुत्र आणि देशासाठी वीरमरण पत्करलेले कर्नल संतोष महाडिक यांच्या आपल्यातून जाण्याला आज एक वर्ष पूर्ण झाली आहेत . त्यांचा शौर्यामुळे केंद्र शासनाने त्याना मरणोत्तर शौर्य पदक देखील दिले आहे. ज्या सैनिकी स्कुल मध्ये कर्णल संतोष महाडिक यांचे सैनिकी शिक्षण झाले त्या स्कुल च्या स्टेडियम ला आज कर्नल संतोष महाडिक यांचे नाव देण्यात आले आहे.
यावेळी महाडिक यांच्या  प्रतिमेला आणि शाहिद स्मारकाला कर्नल महाडिक यांच्या आईच्या हस्ते पुष्पचक्र देखील वाहण्यात आले . या शाळेतील कर्नल महाडिक यांच्या मित्रांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. ज्या शाळेत संतोष महाडिक शिकला लहानाचा मोठा झाला त्या शाळेच्या स्टेडियम ला त्याचे नाव मिळायचा अभिमान वाटत असल्याचे आणि त्याची प्रेरणा याच शाळेतील विद्यार्थी घेतील अशी अशा शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या आई आणि बंधू यांनी व्यक्त केली आहे मात्र हे सांगताना सुद्धा त्यांना त्याचे अश्रू अनावर होत होते.
संतोष यांचे बंधू जयवंत घोरपडे म्हणालेकी, कर्नल संतोष महाडिक यांनी देशासाठी दिलेले बलिदान कोणीच विसरू शकत नाही त्यांचे देशसेवेचे हे  काम पुढे असेच सुरु ठेवण्याचा एक प्रयत्न शहीद महाडिक यांचे मित्र करत आहेत  याचा अभिमान वाटतो.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना कर्नंल संतंोष महाडिक यांचे जीवनावर बनवणय्ता आलेली एक व्हिडीओ फिल्म दाखवण्यात आली. तसेच बेळगाव येथुन आलेल्यामिल्ट्रीच्या एका बँड वादन तुकडीने बँडचे प्रात्यक्षिक दाखवले.  कला शिक्षक सुमंगल नाइक यांनी उपस्थितांना महाडिक यांचा जीवन पट सांंगितला.