कोयना येथे नदीपात्रात शिवसेनेची महाआरती

 

पाटण :- शिवसेना पक्ष प्रमुख यांनी आयोध्ये येथील राम मंदिर उभारणीसाठी दिलेल्या एलगाराचे पडसाद संपुर्ण देशात उमटले आसताना आयोध्या येथे शरयु नदीकाठी झालेल्या महाआरती बरोबर पाटण तालुका शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना येथे नदी पात्रात महाआरती करण्यात आली. यावेळी शेकडो दिवे नदीपित्रात सोडण्यात आले. या महाआरतीस महिला शिवसैनिकांची संख्या लक्षणीय होती. प्रारंभी उपस्तिथ महिलांच्या हस्ते कोयनामाईची महापुजा करुण खणानारळाने ओटी भरण्यात आली.
यावेळी शिवसेना पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील म्हणाले शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आयोध्ये येथील राममंदिर उभारणीसाठी दिलेल्या एलगार “हर हिंदू की यही पुकार पहिले मंदिर फिर सरकार” या एलगाराने संपुर्ण दशातील शिवसैनिक व हिंदू राममंदिर उभारणीसाठी सज्ज झाला आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आयोध्ये येथील राममंदिर बांधण्यासाठी बाबरी मशिद पाडण्याचे धाडस शिवसैनिकांनी केले आसल्याचे धाडसाने सांगितले होते. त्याच धाडसाने शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी राममंदिर उभारणीसाठी धाडस दाखवून “पहिले राममंदिर फिर सरकार” हा यलगार दिला आहे. असे त्यांनी यिवेळी सांगितले.
यावेळी पाटण विधानसभा संपर्क प्रमुख प्रविण शिंदे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रविंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर या महाआरतीस पाटण तालुका उपप्रमुख उत्तमराव कदम, महिला संघटक त्रैशीलाताई काळकुटे, ढेबेवाडी विभाग प्रमुख अशोक पाटील, मोरणा विभाग प्रमुख दादासाहेब सुर्वे, कोयना विभाग प्रमुख किसन कदम, पाटण उपशहर प्र. महादेव खैरमोडे, काशिनाथ विभुते, सिताराम कदम, राजेंद्र पाटणकर, संजय शिंदे, बबन माने, एम.डी.मोहीते, नामदेव मोहिते, जयवंत कदम, विजयराव पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.