म्हसवडच्या सिध्दनाथाचा वार्षिक रथोत्सव यावर्षी माण नदीपात्रातूनच 

म्हसवडः लाखो भाविकाचे श्रध्दा स्थान असलेल्या म्हसवडच्या सिध्दनाथ जोगेश्वरी देवाची  रिंगावण  यात्रेच्या रथ मार्गाचा प्रश्न अखेर रथ ओढणारे  मानकरी व रथाचे मानकरी यानी काढला आसुन रथ नदी पाञातुनच जाणार नदी पात्रात फक्त रथ ओढणारेच आसतील भाविकांनी पाण्याच्या बाहेरून किंवा रथ पाण्याबाहेर आल्यानंतर दर्शन मिळणार भाविक पाण्यात उतरू नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी असे आज झालेल्या रथाचे व रथ ओढणारे मानकरी यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला
सालाबादप्रमाणे या दिवसी गेले वर्षभर पश्चिम दिशेला मंदिराकडे रथाचे मुख आसलेले आजच्या दिवशी रथाचे मुख पूर्व दिशेला सालकरी थराचे मानकरी राजेमाने घराणे व रथ ओढणारे मानकरी,घडसी, सालकरी, डवरी, सालकरी यांच्या बरोबर बारा बलुतेदार याच्या उपस्थित रथाचे तोंड फिरवण्यात आले त्यानंतर झालेल्या मानकरी यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी परंपरेनुसाह रथ माण गंगानदी पात्रातुनच नेण्याचा निर्णय घेण्यात आला रथ ओढणारे व रथाचे मानकरी श्रीचे सालकरी हेच फक्त रथा बरोबर रथ पाण्याच्या बाहेर काढे पर्यंत सोबत राहतील रथ ओढणार्या मानकर्याला वेगळा ड्रेस कोड देण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला या निर्णयाची लेखी पञ तहसीलदार व प्रांताधिकारी यांना देण्यात येणार आहे रथ पाण्यात असे पर्यंत भाविकांनी पाण्यात येवू नये भाविक पाण्यात येणार नाहीत याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे बैठकीत ठरवण्यात आले
तत्पूर्वी काल रथ ओढणार्‍या मानकर्यानी नदी पाञात उतरून पाण्याचा अंदाज घेतला यावेळी साठ ते सत्तर मानकरी पाण्यात उतरले होते पाणी कोठे जास्त तर कोठे कमी होते रथ कमी पाण्याच्या बाजुने नेहण्यास अडचण येणार नसल्याचे पाहुनच आज राजेमाने यांच्या वाड्यात झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला या वेळी रथाचे मानकरी राजमाने कुटूंबातील अजितराव राजेमाने, विजयसिंह राजेमाने, प्रतापसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, सयाजीराव राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, दिपसिंह राजेमाने, तेजसिंह राजेमाने, सुरेश म्हेत्रे, जालिंदर पिसे, चंद्रकांत पिसे, राजु पिसे, मुकीरे, राहुल म्हेत्रे, युवराज सूर्यवंशी सह  माळी समाजातील पिसे, म्हेत्रे, लांब दहिवडे, लिंगे, केवटे, खासबागे, आदी शेकडो मानकरी उपस्थित होते  यावेळी सासण काटीची व रथाची भेट बाजार पटांगण येथे होणार आहे तरी येणार्‍या भाविकांनी व व्यावसायिकंाना कोणताही अडचण भासणार नाही याची खबरदारी घेवूनच सासणकाठी भेट बाजारतळावर होणार असल्याचे अजितराव राजेमाने यानी सांगीतले
यावेळी नगराध्यक्ष भगतसिंग विरकर म्हणाले श्रीचा पारंपारिक रथ  मार्ग  आसलेला नदी पात्रातुनच रथ नेहण्याचा मानकरी मंडळी यांनी घेतलेला निर्णय योग्य असुन पालिकेच्या वतीने सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी विरकर यांनी दिले.