वडूज नगरपंचायत ताकदीने लढविण्याचा भाजपाचा निर्धार

वडूज: येथील ओंकार मंगल कार्यालयात झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता बैठकीत आगामी वडूज नगरपंचायतीची निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार करण्यात आला.

माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर, तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा, डॉ. हेमंत पेठे, सतिश शेटे, माजी सरपंच अनिल माळी, प्रदिप शेटे, बाळासाहेब घाडगे, जयवंत पाटील, अशोक गाडवे, कांतामामा खुस्पे, बाळासाहेब गोडसे, किशोरी पाटील, स्नेहल अंबिके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. येळगांवकर म्हणाले, देशात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. या सत्तेचा फायदा वडूज शहराला होण्यासाठी नगरपंचायतीवर पक्षाची सत्ता येणे गरजेचे आहे. त्याकरीता पक्ष निवडणूकीत ताकदीने उतरणार आहे. निवडणूकीसाठी प्रसंगी समविचारी पक्षाची आघाडी केली जाईल. समाजातील जे जे चांगले लोक येतील त्यांना बरोबर घेवून काम करण्याचा आपला मानस आहे. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेची मते जाणून घ्यावीत. त्याकरीता घरोघरी संपर्क ठेवावा. या बैठकीत प्रभागनिहाय उमेदवारीबाबत चर्चा, विचार विनिमय करण्यात आले. यावेळी प्रा. अजय शेटे, सौ. घाडगे, आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.