चन्नबसवेश्वरांचे विचार आत्मसात करणे, आजच्या काळाची गरज: कोरे

रहिमतपूर: चन्नबसवेश्वरांचे आचार, विचार आचरणात आणून ते आत्मसात करणे.त्यांनी दिलेली शिकवण, कष्ट करुन जीवन जगणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी केले.
रहिमतपूर (ता.कोरेगांव) येथील वीरशैव समाज जंगम मठात चन्नबसवेश्वर पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष वासुदेव माने होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक भिमराव पाटील, विद्याधर बाजारे, शशिकांत भोसले, तानाजी राऊत, जितेंद्र माने, धैर्यशिल सुपले, पोलिस पाटील दिपक नाईक, सचिन बेलागडे, अरूण माने, बाळासाहेब गोरेगावकर, शांताराम आलेकरी, आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आनंदा कोरे पुढे म्हणाले की, वीरशैव समाज संस्थेने राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. गुणवंताचा सत्कार,जेष्ठ नागरिकांचा सत्कार करून एक वेगळा पायंडा पाडलेला आहे हीच आजच्या काळाची गरज आहे. जेष्ठांचा सत्कार होणे, त्यांचे कोडकौतुक करणे म्हणजे त्या वयातील नागरिकांना आनंद वेगळाच असतो.
माजी नगराध्यक्ष वासुदेव माने म्हणाले की, आजच्या पिढीने आपला समाज आपली संस्कृती आपल्या समाजातील रूढी परंपरा जोपासत आपला सर्वांगीण विकास करणे ही आजच्या काळाची गरज आहे. या समाजातील जेष्ठांनी प्रतिकूल काळात केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. अतिकाम करणारी माणसे सर्व समाजात मिळतीलच असे नाही. आपल्या समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो हे उद्याच्या पिढीने आत्मसात करणे आवश्यक आहे.
यावेळी गुणवंतांचा सत्कार जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला. उद्योगपती अनिकेत लव्हाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमास सुर्यकांत बेलागडे, दत्तात्रय टकले, विजय गोरेगावकर, वसंतराव सावंत, सुधाकर सोलकर, श्रीमती पार्वती बाजारे, गजानन नळगुणे, रुग्वेद सोलकर, कावेरी बेलागडे, हेमांगी महाजन, अदिती बेलागडे, अविनाश लव्हाळे, शंतनू शेटे, प्रशांत गोरेगावकर, शर्वरी शेटे, आर्या आलेकरी, अनुष्का आलेकरी, जान्हवी बाजारे यासह वीरशैव समाजातील समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम आलेकरी यांनी केले. सुत्रसंचालन सचिन बेलागडे यांनी केले. आभार विद्याधर बाजारे यांनी मानले.