Friday, April 19, 2024
Homeठळक घडामोडीऔंध संगीत महोत्सवाची सांगता

औंध संगीत महोत्सवाची सांगता

औंध: येथील शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केल्या जाणार्‍या औंध संगीत महोत्सवात अनेक दिग्गज गायक, वादकांनी आपले गायन, वादन व नूत्य सादर केले. अमीरा पाटणकर यांच्या कथ्थक नृत्याने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले तर पं.दिनकरबुवा पणशीकर यांच्या गायनाने संगीत महोत्सवाची सांगता झाली.
यावेळी द्वितीय सत्रामध्ये श्रीमती शुभदाताई पराडकर यांचे गायन झाले. यावेळी त्यांनी राग मुलतानी पेश केला. यामध्ये कासे कहू हा बडा ख्याल बंदिश तसेच ताल झुमरा तसेच छोटा ख्याल बंदिश हमसे तुम रा सादर केला यामध्ये तीनताल पेश केला. त्यानंतर पं.अरुण कशाळकर यांचे गायन त्यांनी राग भिम सादर केला.
यावेळी त्यांनी विलंबित तिलवाडा येरी सखी कैसी तसेच द्रुत तीनताल कल ना पडे मोहे सादर केला. रूपकुमार कुलकर्णी यांनी बासरी वादन पेश केले यावेळी त्यांनी राग अहिर ललित पेश केला. रात्रीच्या सत्रात ललित कला केंद्र व सावित्रीबाई फुले गुरुकुल पुणे विद्यापीठाचे प्रमुख डॉ. प्रविण भोळे यांच्या हस्ते रियाज स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानचे सचिव पं.अरुण कशाळकर, विश्वस्त, अपर्णा फडके, माधवी गोडबोले, सहसचिव श्रीमती अपूर्वा गोखले, कोषाध्यक्षा श्रीमती पल्लवी जोशी, रामभाऊ पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ सदस्य व संगीताचे चार पिढयांचे साक्षीदार रामभाऊ पवार यांनी 90 वर्षे पूर्ण केल्या निमित्त शिवानंद संगीत प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर संगीत महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या कथ्थक नूत्याचा कार्यक्रम झाला.
यावेळी अमीरा पाटणकर यांनी कथ्थक नृत्य सादर केले. त्यांच्या पदन्यासांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. रात्रीच्या शेवटच्या सत्राची सुरुवात पं.व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग बिहाग तसेच राग रागेश्री, तिलक कामोद सादर केला.
त्यानंतर पांडुरंग पवार यांचे एकल तबला वादन झाले.त्यांनी तीनताल सादर केला. त्यानंतर श्रीमती अनुराधा कुबेर यांचे गायन झाले. त्यांनी राग जोगकंस व राग मालकंस पेश केला. उत्सवाची सांगता जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं.दिनकर बुवा पणशीकर यांच्या गायनाने झाली.
यावेळी त्यांनी राग विराट भैरव, कलिंगडा व जौन बहार पेश केला. अतिशय उत्साही वातावरणात यंदाचा औंध संगीत महोत्सव पार पडला. यासाठी शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, औंध संस्थानच्या अधिपती श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, पवार चँरिटेबल ट्रस्ट, ललित कला केंद्र पुणे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, औंध ग्रामपंचायत तसेच अन्य संस्थांचे मोठे सहकार्य लाभले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular