विनयभंगप्रकरणी शेनवडीत एकास अटक

औंध: शेनवडी (ता.खटाव) येथील 23 वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एक जणाविरोधात औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित युवती व संशयित आरोपी महादेव काटकर रा.शेनवडी हे दुचाकीवरून रहाटणी ते शेनवडी रस्त्यावरून जात असताना महादेव काटकर यांनी गाडी थांबवून युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबतची फिर्याद औंध पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार एस.बी.काळेल करीत आहेत.