कराड: यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याने संचालक मंडळ हे सभासदांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी असून सर्व सभासदांना सामावून घेण्यासाठी आहे. 97 वी घटना दुरूस्ती सर्वांसाठी लागू आहे. कोणत्याही सभासदाचे सभासदत्व रद्द करणार नाही, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. गतवर्षीच्या हंगामाचे फायनल बिल देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करत असल्याचे त्यंानी सांगितले.
शिवनगर (ता.कराड) येथे सोमवारी कारखान्याची 63 वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विषय वाचन केल्यानंतर सर्व 12 विषय एकमताने मंजुर करण्यात आले राज्य मंत्री डॉ.अतुल भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, लिंबाजी पाटील, दयानंद पाटील व संचालक उपस्थित होते. माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी उपस्थित केलेल्या लेखी 16 प्रश्नांची उत्तरे डॉ. भासले यांनी सविस्तरपणे दिली. डॉ. इंद्रतिज मोहितेंच्या लेखी प्रश्नांचीही उत्तरे दिली.
अक्रियाशील सभासदत्वाबाबत खुलासा करताना डॉ.सुरेश भोसले म्हणाले की 97 वी घटनादुरूस्ती सहकारी संस्थांना लागू आहे. या प्रक्रियेत सभासदत्व रद्द होत नाही. सभासदत्व रद्द न होण्यासाठी पाच वर्षातून एकदा वार्षिक सभेस सभासदाला उपस्थित राहावे लागणार होते. आम्ही त्यात शिथिलता आणली. एखादा सभासद वार्षिक सभेस आला नाही तरी त्याचे सभासदत्वाबाबत 3 हजार 720 जणांना नोटीस बजावली आली होती. त्यातील 417 जण मयत आहेत. यातील 1621 सभासदांनी गेल्या 12 वर्षात कारखान्यास ऊस घातलेला नाही. 1400 सभासदांनी 10 वर्षात ऊस घातलेला नाही. अक्रियाशील प्रकरणात रजिस्ट्रारकडे अपिल करता येते. एक वर्ष ऊस घातला तरी अक्रियाशील सभासद क्रियाशील होऊ शकतो.
डॉ. भोसले म्हणाले की, गेल्या संचालक मंडळाच्या कारकिंर्दीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कारभाराच्या चौकशा सुरू आहे. कलम 83 ची चौकशी झाली असून कलम 88 ची चौकशी सुरू आहेत. स्वर्गीय आप्पांच्या नंतर सर्वाधिक काळ कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली आहेकारखान्यावर जीवाणू खत प्रकल्प सुरू केला असुनतो कारखाना एवढा मोठा होऊ शकतो. हा कारखाना राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मध्यंतरीच्या काळात संघर्ष झाला नसता तर आतापर्यंत कारखान्याची चार युनिट झाली असती. इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण असुन इथेनॉलला प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण असुन इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेस उपस्थित राहण्यासाठी संचालक अविनाश मोहिते हे समर्थकांसह घोषणाबाजी करत आले. मात्र गेटवर पोलिसांना प्रवेशपत्र मागितले. ते नसलेल्यांना सभेस प्रवेश नाकारला यावेळी मोहिते समर्थकांनी घोषणा दिल्याने भोले समर्थकांनीही घोषणाबाजी केली. यावेळी धक्काबुक्की झाली. त्यानंतर अविनाश मोहिते गेटवरूनच निघूनच गेले.
कोणत्याही सभासदाचे सभासदत्व रद्द करणार नाही: डॉ.सुरेश भोसले
RELATED ARTICLES