रिक्षाचालकांचे कल्याण मंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करणार: ना.डॉ.अतुलबाबा भोसले

कराड: रिक्षाचालकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी भाजपा सरकारने सातत्याने प्रयत्न केले आहेत. रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
मलकापूर (ता. कराड) येथील आतिश मंगल कार्यालयात शुकवारी (ता. 20) कृष्णा कराड तालुका ऍटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने आयोजित रिक्षा चालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर रिक्षा कृती समितीचे राज्य सरचिटणीस बाबा, राज्य उपाध्यक्ष गप्फार नदाफ, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार, पिनू जाधव, माजी नगरसेवक सुभाष माने, भाजपाचे मलकापूर शहराध्यक्ष सुरज शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रिक्षा कृती समितीचे राज्य सरचिटणीस बाबा कांबळे म्हणाले, की रिक्षाचालकांचा हा मेळावा पाहिल्यावर मन भरून आले आहे. नामदार अतुलबाबा भोसले यांच्यावर रिक्षावाले प्रेम करतात आणि अतुलबाबाही त्यांची काळजी घेतात, ही बाब खूपच आनंददायी आहे.
रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. रिक्षाचालकांच्या सुखदुःखात सहभागी होणार्‍या अतुलबाबांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सुहास कदम, बाबासो मोरे, दिपक गरड, रहिम पटेल, हिम्मत मुजावर, विजय माने, दिनकर काशिद, फारुख बागवान, विजय लोखंडे, अशोक पवार, मुख्तार नदाफ, निलेश माने, शहानवाझ मुल्ला, राजू बागल, निलेश थोरात, संजय लिपारे, महेश देवकर, जहांगीर सय्यद यांचेसह तालुक्यातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.