Friday, April 19, 2024
Homeठळक घडामोडीजागतिक वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृष्णाचे नाव अग्रस्थानी राहील: डॉ.कोकाटे

जागतिक वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृष्णाचे नाव अग्रस्थानी राहील: डॉ.कोकाटे

कराड: जागतिक स्तरावरील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहील, असे गौरवोद्गार फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. के. कोकाटे यांनी काढले. कृष्णा अभिमत विद्यापीठात फार्मसी अधिविभागाच्यावतीने आयोजित 9 व्या आंतरविद्याशाखीय संशोधन परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. निलिमा मलिक, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, संशोधन संचालक डॉ. अरूण रिसबूड, अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. आर. सी. डोईजड प्रमुख उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात डॉ. कोकाटे म्हणाले; की डॉक्टर, पॅरामेडिकल पर्सन्स म्हणजेच वैद्यकीय सेवेशी संलग्नित लोकं आणि रूग्ण ही आरोग्यव्यवस्थेची तीन चाके आहेत. आरोग्यदायी भारतासाठी या तिन्ही घटकांनी एकमेकांशी समन्वय साधून कार्यरत राहिले पाहिजे.
देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी शासनाने त्यावरील खर्च वाढविला पाहिजे. सध्या राज्य शासनामार्फत चालविली जाणारी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची आयुष्यमान भारत या योजनांमुळे गोरगरीब कुटुंबातील लोकांना मोठा लाभ होत असून, आरोग्य प्रश्नांबाबत जागृती करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच घटकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. सुरेश भोसले यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
डॉ. आर. सी. डोईजड यांनी स्वागत केले. डॉ. अरूण रिसबूड यांनी प्रास्तविक केले. प्रा. ज्योत्स्ना गांधी व प्रा. सुप्रिया मंद्रुपकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अक्षता कोपर्डे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या वैद्यकीय विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. टी. मोहिते, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलू, कृष्णा रूग्णालयाचे मेडिकल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, प्राध्यापक, डॉक्टर्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular