डॉ.अतुलबाबा भोसले यांच्यासह विविध मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला

कराड: भाजपा-शिवसेना महायुतीचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी गौरवी भोसले यांनी आज सकाळी ठीक 7 वाजता रेठरे बुद्रुक येथील पवार मळा केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला.
त्यानंतर याच केंद्रावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा महिला उद्योग समूहाच्या संस्थापिका उत्तरा भोसले, विनायक भोसले यांच्यासह मोहिते-भोसले कुटुंबातील अन्य सदस्यांनी मतदानाचा हक्क बजाविला.