विद्यार्थ्यांनों शिक्षक व शैक्षणिक संस्थेचा कधीही विसर पडू देऊ नका: कुलगुरू

कराड: आपला भारत देश हा तरूणांचा देश आहे. देशातील सरासरी 22 ते 25 वर्षे वयोगटातील तरूणांना, जगावर छाप उमटविण्याची संधी आहे. तसेच, आय.टी. म्हणजे आपल्या भारत देशाला इंडियन टँलन्ट चा देश म्हणूनही ओळखले जाते. आज पदवी घेत असलेल्या अभियंत्यांना, सर्व क्षेत्रातील विस्तृत माहिती व आपण निवडलेल्या क्षेत्राचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. अभियंत्यांनी आपले ध्येय निश्‍चित करून, निश्‍चित केलेले ध्येय दर तीन महिन्यानंतर अद्यावत करावे. कारण, तंत्रज्ञान हे प्रचंड वेगाने बदलत आहे. जीवनामध्ये अपयश हे असते, खरे तर अपयश ही यशाची पायरी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, सततच्या अपयशानंतर अब्राहम लिंकन यांनी देशाच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत मारलेली मजल ही तुम्हां तरूणांना आदर्शवत व मार्गदर्शक आहे. आज तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये शिकलात व पदवीप्राप्त करीत आहात, तेथील शिक्षक व शेक्षणिक संस्थेचा तुम्ही कधीही विसर पडू देऊ नका असे प्रबोधनात्मक मागदर्शन, संजय घोडावत विद्यापिठ कोल्हापूरचे कुलगरू डॉ.व्यंकटेश रायकर यांनी येथील डॉ.अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्युटस् डॉ.दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये, महाविद्यालयीन पातळीवर आयोजित केलेल्या पहिल्या पदवी वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे पदावरून बोलताना केले. तसेच, पदवीप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत, शुभेच्छा दिल्या.
यावेळी, शिवाजी विद्यापिठाचे परिक्षा नियंत्रण व मुल्यांकन संचालक, प्रा.महेश काकडे सन्माननिय पाहुणे म्हणून उपस्थिती होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक – अध्यक्ष डॉ.अशोकराव गुजर हे होते. तर, जी.के.गुजर ट्रस्टच्या सचिव डॉ.माधुरी गुजर(मॅडम), प्राचार्य डॉ.अन्वर मुल्ला, उपप्राचार्य प्रा.हणमंत कुंभार, जी.ए.कॉलेज ऑफ कामर्स सांगलीचे प्रा. बी.बी.गुडेवाडी, महाविद्यालय परिक्षा नियंत्रक प्रा.सुनिल बागडे व समन्वयक प्रा.अभिजीत सुर्यवंशी यांची प्रमूख उपस्थिती होती.
प्रा.महेश काकडे मार्गदर्शन करताना म्हणाले, सातत्यपूर्ण कार्यक्षमता टिकविण्याचे आव्हान तुम्हां विद्यार्थ्यापुढे आहे. आपल्या उत्कृष्ठ अशा भवितव्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करा.आपली क्षमता, कष्ट करावे लागणारे यंत्र आणि संधी यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करा. तुम्हांला समाजमान्यता, आदर व सत्ता यांची योग्य सांगड घालता येणे आवश्यक आहे. कारण, आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार असतो व याचे सतत भान राहीले पाहिजे.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ.अशोकराव गुजर यांनी, महाविद्यालयीन पातळीवर पदवीदान समारंभ साजरा करण्याचा शिवाजी विद्यापिठाने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. आज महाविद्यलायामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मानाने पदवी प्रदान केली जाणार आहे व ती स्विकारताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील उत्साह हा निश्‍चितच ओसंडून जाणारा असणार आहे. विद्यापिठ गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे पालकही उत्साहाने या समारंभामध्ये सहभागी आहेत त्यांचेही मी स्वागत व अभिनंदन करतो असे सांगून, उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या समारंभामध्ये, महाविद्यालयाच्या अणुविद्युत व दूरसंचार विभागामधील(ई अ‍ॅन्ड टिसी) शिवाजी विद्यापिठ गुणवत्ता यादिमध्ये तृतिय क्रमांक प्राप्त केलली कु.मृणाल दुर्गावळे, सहावा क्रमांक प्राप्त केलेली कु.प्रगती सुर्वे व आठवा क्रमांक प्राप्त केलेली कु.स्नेहल सुपेकर या विद्यार्थिनिंचा तसेच, याच विभागाचे विद्यार्थी सिध्दार्थ भोकरे, कु.अश्‍लेषा माने-देशमुख व कु.नेहा गाडे यांनी सादर केलेल्या मह्युमन टू ह्युमन इंटरफेसफ या राज्यस्तरीय प्रकल्प प्रदर्शन (डिपेक्स) मध्ये मप्रथमम क्रमांक मिळविल्याबद्दल व कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड इंजिनिअरींग विभागाची कु.धनश्री चव्हाण या विद्यार्थिनीला, शिवाजी विद्यापिठाच्यावतीने दिला जाणारा; कै.आरती रितेश पाटणकर-जगताप स्मृति पुरस्काराची रोख रक्कम रूपये सहा हजार मिळाल्याबद्दल, मान्यवरांचे हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व सत्कार डॉ.अशोकराव गुजर, प्राचार्य डॉ.अन्वर मुल्ला, उपप्राचार्य प्रा.हणमंत कुंभार यांचे हस्ते करण्यात आला. समारंभाचे स्वागत गीत कु.सुप्रभा पोटफोडे व कु.गायत्री कुंभार यांनी सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अन्वर मुल्ला यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.सायली शिंदे यांनी करून दिला. आभार प्रा.सौ.स्नेहा पाटील-सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली व सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कार्यक्रमासाठी विभागप्रमुख प्रा.प्रकाश चोरगे, प्रा.हेमंत शेटे, प्रा.शिवाजीराव लोकरे, प्रा.आशिष पाटील व डॉ.अभिजीत झेंडे, क्रिडासंचालक प्रा.अयुब कच्छी, प्रंबधक अशोक अडसुळे, जनसंपर्क अधिकारी अबुबकर सुतार, टिपीओ प्रा.प्रकाश बनसोडे, प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, पदवीप्राप्त विद्यार्थी व त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.परवीन किणीकर व कु.अल्फीया मुजावर आदिंनी परिश्रम घेतले.