Thursday, April 18, 2024
Homeठळक घडामोडीकराड चिपळुन महामार्ग दुरावस्थेचे श्रेय कोणाचे

कराड चिपळुन महामार्ग दुरावस्थेचे श्रेय कोणाचे

कराड : कराड चिपळुन राज्य मार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी आपणच प्रयत्न केल्याचा दावा गेल्या अनेक महिन्यांपासुन सत्ताधारी पक्ष, त्यांचे लोकप्रतिनीधी तसेच विरोधी पक्षातील लोकप्रतिनीधी करत आहेत. त्याचवेळी याच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गेल्या वर्षात अनेकांचे बळी गेले.
शेकडोजण कायमचे जायबंदी होवून वाहनधारकांसह वाहनांचेही कंबरड मोडले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा या महामार्गाचा श्रयेयवाद उफाळुन आला होता. पण दुष्परिणामांचे श्रेय घ्यायला कोणीही पुढे येत नाही.
अनेक महिन्यांपासुन महामार्गाचे काम सुरू आहे. तब्बल वर्षभराचा कालावधी उलटुन गेला असला तरी या कामाला मंजुरी मिळाली आहे तर मग हे काम केवळ काही विभागात तुकडया तुकडयातच का सुरू आहे हा प्रश्‍न आहे. अधिकृत ठेकेदारांनी स्थानिक पातळीवर काही पोट ठेकेदारांना प्रसाद वाटल्याप्रमाणे काही मिटर, किलोमीटर अशा पध्दतीने कामांचे वाटप केल्याचे बोलले जाते, टक्केवारीवरून अर्थपुर्ण व्यवहारही पोट ठेकेदारांमार्फत झाल्याची चर्चा आहे.
पोट ठेकेदारांनी पदरमोड करून कोटयावधीची कामे मिळवली, शक्य तेवढी कामेही केली, मात्र आता जवळची पुंजी संपली आणि झालेल्या कामांचे पैसे मिळत नाहीत त्यामुळे आहे त्या अवस्थेत काम बंद करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नाही.
कामासाठी ज्यांना टक्केवारी दिली त्यांना जाब विचारावा तर अडकेले पैसेही न मिळण्याची भीती त्यामुळे इकडे आड तिकडे विहिर अशी अवस्था त्यांची झाली आहे.
मुळात एकुण कामांपैकी पन्नास टक्केही काम सुरू झाले नाही. जे सुरू आहे ते देखील केवळ रस्ता उकरून ठेवण्यापर्यंत मर्यादित असल्याने मग त्यांचा सार्वत्रिक तोटाच होवू लागला आहे. यात संबंधितांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली नसल्याने दैनंदिन अपघातांची मालिका सुरूच आहे. इतरवेळी सामान्यांना कायद्याचा धाक दाखविणारी पोलिस, प्रादेशिक परिवहन, महसूल अथवा बांधकाम विभागाची हाताची घडी तोंडावर बोट आहे.
महामार्गाच्या आपापल्या मतदारसंघातील कामांचे श्रेय घेण्यासाठी मान्यवर मंडळी व नेते मंडळीनी उर बडवुन घेत होती. लोकसभा निवडुकीच्या प्रचारात हा श्रेयवाद उफाळुन आला होता. जसे कामाचे श्रेय घ्यायला हे मान्यवर अनेकांचे बळी, कित्येकजण झालेले जायबंदी यांचीही जबाबदारी ते घेणार का असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular