डॉ.जयवंत म्हेत्रे यांची प्राचार्यपदी निवड

कराड: येथील शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.जयवंत पाटील महाविद्यालय, बोरगांव या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी पाच वर्षासाठी निवड झालेली आहे. या निवडीबद्दल डॉ. म्हेत्रे यांचा प्राचार्य डॉ.जे.एस पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
त्यावेळी ते म्हणाले, प्रा. डॉ.म्हेत्रे यांना विवेकानंद कॉलेज मध्ये शिकत असताना परंमपुज्य बापुजींचा परिसस्पर्श झाल्याने त्यांच्या जीवनाचे सोने झाले. इंग्रजीचा एक नामांकित प्राध्यापक म्हणुन त्यांनी अनेक उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांच्या मध्ये इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणुन त्यांचे काम उल्लेखनीय ठरले. संस्थेच्या विविध महाविद्यालयात काम करताना त्यांनी नेहमीच सर्व प्राचार्यांबरोबर सहाय्यक भूमिका घेऊन नॅकला अभिप्रेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला. याप्रसंगी प्रा.ए.बी. कणसे व प्रा.डी.जी. मोहिते यंानी मनोगते व्यक्त केली व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर गुरूदेव कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रा. डॉ. म्हेत्रे यंानी श्री स्वामी विवेकांनद शिक्षण संस्थेच्या तळमावले, तुळजापुर, सातारा, नागठाणे व कराड येथील महावद्यालयात एकूण छत्तीस वर्ष सेवा केली. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना संस्थेच्या प्राध्यापकांनी त्यंाना केलेले मार्गदर्शन व मदत तसेच संस्थेने एम.ए. चा रिझल्ट लागल्याबरोबर दुसर्‍याच दिवशी कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी दिल्याचा आवर्जुन उल्लेख करून ॠण व्यक्त केले.
यानिवडीबदद्ल श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे आजी माजी पदाधिकारी व गुरूदेव कार्यकर्ते तसेच कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंंखे, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे, सहसचिव प्रशासन प्राचार्य कार्याध्यक्ष सहसचिव प्रशासन प्रचार्य डॉ. युवराज भोसले, सहसचिव अर्थ प्रचार्य डॉ. राजेंद्र शुभांगी गावडे, सहसचिव प्रशासन प्राचार्य डॉ.युवराज भोसले, सहसचिव अर्थ प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, प्राचार्य डॉ. जे. एस.पाटील, सर्वश्री प्राचार्य डॉ. अशोक करांडे, आर.आर.कुभांर, एल.जी.जाधव, अशोक थोरात, आर.एस.झिरंगे, एस.बी.मोटे, सुहास साळुंखे, पी.यु.शेठ, ए.एस.पाटील व प्रा. अविनाश लेवे, पी.व्ही. सातपुते, डॉ. गणेश जाधव, डॉ. मनोज गुजर, पोलिस उपअधिक्षक संभाजी पाटील, पोलिस अप्पर उपायुक्त संजीवकुमार पाटील तसेच माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, अध्यक्ष प्रमोद सुकरे, खजिनदार नितीन ढापरे, उपाध्यक्ष श्री माणिक डोंगरे यंानी अभिनंदन केले. तसेच समाजातील स्तरातुन या निवडबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.