श्री संतकृपा इंजिनिअरींगचा पुणे येथील विविध कंपन्यांशी सामजस्य करार

कराड : घोगांव ता.कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (बी टेक) या महाविद्यालया मध्ये प्रवेश घेऊन बाहेर पडणार्‍या अभियंत्यांसाठी संस्था विविध संकल्पना राबवत असते.
संस्थेचे सचिव प्रसून जोहरी,सीईओ प्रदीप कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने महाविद्यालयाचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी विद्यार्थ्यांच्या हितासाठी काळाची गरज ओळखून आपला विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी एक आदर्श व तज्ञ अभियंता निर्माण होण्यासाठी दर्जा व गुणात्मक शिक्षणाबरोबर अनेक टेक्निकल स्पर्धाही आयोजित करत असतात. तसेच विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध व्हावी व त्याचे करिअर यशस्वी व्हावे या हेतूने अनेक प्रयोग सातत्याने ते करत असतात त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाने पुणे येथील तज्ञ कन्सल्टंट म्हणून प्रसाद भागवत यांची नियुक्ती केली आहे.
त्यांच्या प्रयत्नातून महाविद्यालयाने नुकत्याच पुणे येथील पाच नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे. त्यामध्ये प्रावी अ‍ॅटो स्विंग प्रायव्हेट लिमिटेड, कॉसमीक रेफ्रिजरेशन, पराग देशपांडे अ‍ॅन्ड असोसिएट, सुबोधन इंजिनियर्स, पॉवर कंट्रोल इंजिनियर्स अशा या पाच कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आला.
यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी महाविद्यालयाने प्राप्त केली आहे. हा करार करताना महाविद्यालयाचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी कंपन्यांचे अधिकारी व समन्वयक प्रसाद भागवत उपस्थित होते.