श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त चोराडेत रंगला कुस्त्यांचा आखाडा

लहान मोठया कुस्त्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने
म्हासुर्णे: चोराडे ता.खटाव येथील गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रेची सांगता कुस्त्याच्या भव्य आखाड्याने झाली .
या कुस्त्याच्या मैदानामध्ये या भागातील नामवंत मल्लांनी हजेती लावली होती. या मैदानात अनेक चितपट कुस्त्या झाल्यामुळे कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
या मैदानात जवळपास पन्नास ते साठ लहान मोठया कुस्त्या पार पडल्या, यावेळी कुस्ती पाहवयास आलेल्या प्रेक्षकांनी कुस्तीचा आनंद लुटला.
परंपरेप्रमाणे भरणार्‍या या यात्रेमध्ये कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात येतो. तसेच भक्तीमय वातावरणात यात्रा उत्सव पार पडला. या ठिकाणी श्री भैरवनाथ यात्रेत आदल्या दिवशी सकाळी सात वाजता गुलाल खोबर्‍यासह पालखी सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी दुसर्‍या दिवशी सायंकाळी पाच च्या सुमारास कुस्त्याच्या फडात पुसेसावळी, म्हासुर्णे, खटाव पारगाव, मायणी, मसुर,औंध, कुंडल, कडेगाव ,कराड या भागातील मल्लांच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या.
यामध्ये 50 रुपयांपासुन 5000 रुपयापर्यतच्या कुस्त्यांचे सामने रंगले.तर काही कुस्त्या निकाली झाल्या.तसेच शालेय मुलांना सुट्टी लागल्यामुळे बाहेर गावी असणारे भाविकांची गर्दी मोठ्याप्रमाणात होती.