Saturday, April 20, 2024
Homeठळक घडामोडीनागपूर येथे ‘अहिंसा पतसंस्था’ दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित

नागपूर येथे ‘अहिंसा पतसंस्था’ दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित

म्हसवड: महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने नागपूर येथे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर व सहकार संवाद आयोजित केला होता. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून सहकार चळवळीत करणारे सहभागी झाले होते.
यामध्ये ना.नितिन गडकरी, रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री भारत सरकार, महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त सतिशजी सोनी साहेब, महाराष्ट्र राज्याचे अप्पर निबंधक सहकारी संस्था, डॉ.पी.एल.खंडागळे साहेब, मिलिंद सोबले, उपनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षकाकासाहेब कोयटे,आमदार कृष्णा खोयडे, फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, महासचिव डॉ.शांतीलाल सिंगी, खजिनदार दादाराव खुपकर, फेडरेशन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी मार्गदर्शन केले.
सहकारी पतसंस्था आपल्या स्वबळावर कामकाज चालवतात त्यांना शासनाचे कोणतेही सहकार्य नसते त्याच बरोबर बदलते आधुनिक तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, सामजिक राजकीय, आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील घडामोडीचा पतसंस्थांच्या कार्यभारावरही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होत असतो.
या सर्वांचा समतोल साधून पतसंस्था आपले कामकाज करतात.सभासदांची विश्वासहर्ता वाढवितात, नफा मिळवतात. आपल्या ग्राहकांचा विकास साधतात आणि प्रगतीचे शिखर गाठतात.अशा राज्यातील पतसंस्था इतर पतसंस्थांना रोल मॉडेल ठराव्यात यासाठी या कार्यक्रमात दिपस्तंभ पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
अहिंसा पतसंस्थेस महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त श्री सतिश सोनी यांचे हस्ते संस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी याना दिपस्तंभ पुरस्कार सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
अहिंसा पतसंस्थेला दिपस्तंभ पुरस्कार मिळाल्याने विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular