Friday, April 19, 2024
Homeठळक घडामोडीमाजी विद्यार्थ्यार्ंतर्फे होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

माजी विद्यार्थ्यार्ंतर्फे होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

म्हसवड: वरकुटे- मलवडीसह परिसरातील आर्थिकदुष्ट्या मागासलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात मदत आणि त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने यशवंतराव चव्हाण हायस्कूल सन 1991 च्या बँचच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने इ.9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व सायकल वाटप करण्यात आले.
वरकुटे – मलवडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच बाळकृष्ण जगताप यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व सायकल वाटप करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त डिवायएसपी दत्तात्रय सोनवणे, उपसरपंच आशा चव्हाण, माजी उपसभापती विजय बनसोडे, मार्केट कमिटीचे माजी सभापती अमोल जगताप, माजी सरपंच जालिंदर खरात, माजी सरपंच जयसिंग नरळे, अनिकेत आटपाडकर, साहेबराव खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
सन 1991 बॅचचे बापूसाहेब मिसाळ, रमेश कुंभार यांनी पुढाकार घेऊन सहकारी वर्गमित्रांना बरोबर घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी डॉ.सत्यवान आटपाडकर, सुनिल केंगार, शहाजी खरात, ब्रम्हदेव कुंभार व शहिदा तांबोळी-आतार यांनी 14 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली तर म्हसवड येथील अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सायकल देण्यात आली.
शासनाकडून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र कौटुंबिक परिस्थितीमूळे अनेक गरिब व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरेस वह्या व इतर शैक्षणिक साहित्य मिळत नाहीत. वरकुटे – मलवडी परिसरात सतत निर्माण होत असलेल्या दुष्काळी परिस्थितीने गोर गरिबांचे कंबरडे मोडले आहे.अशा कुंटुबातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य मिळावे या हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून सन 1991 च्या बॅचच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्य देत असते. या वर्षीही 14 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व एका विद्यार्थीनीला सायकल देण्यात आली. प्रास्ताविक बापूसाहेब मिसाळ यांनी केले सूत्रसंचालन संजय जगताप यांनी केले तर दादासाहेब काळेल यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular