महाराष्ट्र अथलेटिक असोसिएशनकडून माणदेशी चॅम्पियन्सच्या खेळाडूंचा गौरव

म्हसवड: महाराष्ट्र अथलेटिक असोसिएशनकडून माणदेशी चॅम्पियन्सचे खेळाडू अदिती बुगड (नॅशनल डिस्कस थ्रो खेळाडू) आणि वैष्णवी सावंत ( नॅशनल 3000 मी स्टीपल चेस खेळाडू) यांचा उच्च कामगिरीचा गौरव करण्यात आला.
आदीती बुगडं हिने आज पर्यंत 16 वेळा नॅशनल खेळली असून, तिचे रेकॉर्ड आहे. अदिती 2020 साठी वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी तयारी करत आहे. तसेच वैष्णवी हिने 10 हून अधिक नॅशनल खेळल्या आहेत. ती 2024 च्या ऑलिम्पिकसाठी सराव करत आहे.
माण देशी चॅम्पियन्स चे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जेचा कोचिंग देण्याचा प्रबंध केला आहे.
त्याच बरोबर ओमकार गोंजारी, महलींग खांडेकर, बनू बंगर, लोखंडे, राजू या सर्व कोच नी त्यांचे अभिंदन केले. आणि ह्या सर्वान मधे त्यांच्या पालकांचा मोठा हात आहे. ह्या दोन्ही खेळाडूंना इंडस इन बँकेचे सहकार्य लाभत आहे.