सिद्धनाथ हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

म्हसवड: अंबवडे (ता.कोरेगाव) येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनि.कॉलजेच्या19 वर्षाखालील सागर गायकवाड याने गोल्ड मेडल, अक्षय मासाळ याने रौप्य सिल्व्हर मेडल, तर समाधान खांडेकर याने कास्य पदक पटकावले.
या तीन विद्यार्थ्यानी उज्वल यश संपादन करुन त्यांची आळंदी -देहू येथे गुरुवार दि 17 रोजी होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.त्यांना वस्ताद पोपट रुपनवर क्रिडा शिक्षक मारुती लोखंडे व उत्तम पोळ सर यांनी मार्गदर्शन केले.
त्याच्या या अभूतपूर्व निवडी बद्दल सातारा जि.प.अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर,फलटणचे ग.कौ.सदस्य पथ्वीराज राजेमाने (गोविंदराजे) स्कूल कमिटी चेअरमन हेमंत रानडे, सदस्य नितीनशेठ दोशी, विपुल दोशी, विश्वजित राजेमाने, संभाजी माने, प्राचार्य एम.जी नाळे उपप्राचार्या रुक्साना मोकाशी पर्यवेक्षक सौ.शिंदे मँडम यांनी त्यांचा सत्कार करुन पुढील विजयासाठी शुभेच्छा दिल्या.