Friday, March 29, 2024
Homeक्रीडाविरळी येथील कुस्ती मैदानात पै.विशाल कोकरे विजयी

विरळी येथील कुस्ती मैदानात पै.विशाल कोकरे विजयी

म्हसवड: माण तालुक्यातील विरळी येथील श्री जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात म्हसवडच्या पै. विशाल कोकरे याने पै.सागर ढेरे यास चितपट करून प्रथम क्रमांकाचे पंधरा हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. प्रथम क्रमांकांचे बक्षीस युवा नेते लालासाहेब रंगनाथ गोरड यांचे तर्फ देण्यात आले. दुसर्‍या क्रमांकाची कुस्ती पै.बापू चौगुले विरुद्ध पै.कृष्णा नागवे बरोबरीत सोडवली. अकरा हजार रूपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले. हे बक्षिस उत्तमराव पाठणकर (आण्णा शेठ) यांच्या वतीने देण्यात आले.
तिसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीत पै.योगेश कदम याने पै.अतिष झिमलवर मात केली. त्यास दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. हे बक्षीस मियाभाई मुलाणी यांच्या स्मरणार्थ वजीरभाई मुलाणी यांच्या वतीने देण्यात आले. याशिवाय या कुस्ती मैदानात अनेक कुस्त्या चटकदार झाल्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
हेकुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी सरपंच प्रशांत गोरड, चिलारवाडीचे उपसरपंच तानाजी झुरळे, चिलारवाडीचे पोलीस पाटील रामचंद्र घुटुकडे, विरळीचे पोलीस पाटील रायचंद गोरड, चंद्रहार नलावडे, किरण झुरळे, विकास घुटुकडे, दुर्योधन देवकाते, हेमंत नलावडे, त्रिबंक नलवडे, अमर गोरड, गुलाब घुटुकडे, साहेबराव गोरड ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीने परिश्रम घेतले.
पंच म्हणून वस्ताद शिवाजी दिडवाघ, सदाशिव गोरड, वस्ताद पोपट रुपनवर, वस्ताद महालिंग खांडेकर, पै.सतीश दिडवाघ, पै. नवनाथ खांडेकर, विलास रूपनवर, संभाजी विरकर, अनिल सरगर, दिलीप दिडवाघ, राजू विरकर, दादासाहेब गोरड, दत्ता गोरड, सुभाष लाडे, लुनेश गोरड, विजय गोरड यांनी काम पाहिले. यावेळी परशुराम पवार यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular