बालकांचे हक्क व सुरक्षा करणे काळाची गरज: गणेश वाघमोडे

म्हसवड: देशाचे भवितव्य ज्यांच्या हातात सोपविणार आहोत त्या बालकांचे हक्क त्यांना मिळवून देणे व त्यांची सुरक्षा करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी म्हसवड येथे केले.
म्हसवड पोलीस स्टेशन म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिवीर शैक्षणिक संकुल येथे बाल सुरक्षा सप्ताह यानिमित्ताने बालकांचे हक्क व सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे,संस्था अध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर,संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, मुख्याध्यापक अनिल माने आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना गणेश वाघमोडे म्हणाले राज्यात बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत जाणीव जागृती होण्याकरिता दि.14 ते 20 नोव्हेंबर हा सप्ताह बाल सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहेत. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना आदर्श नागरिक बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.लहान बालके बाल कामगार व बाल मजुरी या सारख्या दिशेकडे जाऊ नयेत त्यासाठी पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. मुलांना व्यसनाधीनता या पासून दूर देवावे. मुलांच्या घरी भेट देवून त्यांच्या कुटूंबियांना शिक्षणाचे महत्व समजावणे, पालकांकडून मुलांचे हक्कांच्या संरक्षणासाठी मुलांना शिक्षण, आरोग्य, पोषक आहार, यासाठीची व्यवस्था प्रणाली समजावून सांगणे आणि बालविवाह, बालमजूर, विविध प्रकारचे होणारे शोषण इत्यादी अनिष्ठा प्रथा निर्मुलनासाठी पालकांमध्ये जाणीवजागृती करणे गरजेचे आहे. पालकांनी बालकांचे हक्क व सुरक्षा करण्याचे आवाहन वाघमोडे यांनी केले.
यावेळी संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बाबर यांनी केले व आभार तुकाराम घाडगे यांनी मानले.