श्री.सिध्दनाथ देवस्थानच्या रथोत्सवात सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज

म्हसवड: येथील श्री.सिध्दनाथ देवस्थानची रथोत्सव यात्रा बुधवारी (दि.27) आहे. या यात्रेस सुमारे पाच लाख भाविक येतील असा अंदाज आहे. यात्रेकरूंच्या सुविधेसाठी पालिकेने शहरातील रस्ते, यात्रा मैदान, रथमार्ग, वाहनतळ, स्वच्छ नळपाणी पुरवठा व मलेरिया डेंगू इत्यादी साथीच्या रोगावर नियंत्रण राखण्यासाठी युध्द पातळीवर उपाययोजनात्मक कामे सुरु केली आहेत.
यंदा माण नदीच्या पात्रातून पाणी वाहत असव्यामुळे व यात्रा मैदान नजिकच्या नदी पात्रातील बंधाराही भरुन वाहत असल्यामुळे पारंपारीक नदी पात्रातून काढण्यात येणारी रथ मिरवणूकीचा मार्ग बदलण्यात येणार आहे. यात्रा मैदान ते पालिका कार्यालयापासून बसस्थानकानजिकच्या सातारा- पंढरपूर मार्गे रथ मिरणूक मार्गस्थ केली जाणार आहे. या मार्गावरील जागोजागचे खड्डे मुरुम मातीने भरुन घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सराव रस्ते स्वच्छता मोहिमे सुरु आहे. नळपाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीची गळती थांबिण्याचीही कामे सुरु आहेत.
सातारा-लातूर रसत्यावरील वडजाई ओढ्यातील नविन पुलाचे बांधकाम पुर्णत्वास नेहले जात असून हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. या पुलानजिकच रथ मिरवणूकीचा पारंपारिक थांबा असून वडजाई ओढ्यात्ीस् पुला नजिकच ओढ्याच्या पात्रात् रस्ता विकसित करण्याचे काम सध्या सुरु आहे.
पोलिस ठाणे व पालिका यांच्या समन्वयाने शहरास जोडले गेलेल्या रसत्यावर सोयीच्या ठिकाणी यात्रेकरूंच्या खाजगी वाहनांसाठी वाहनतळाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.यात्रा कालावधीत व तत्पूर्वी् मलेरिया व डेंगूच्या् साथीवर नियंत्रणासाठी डांस निर्मूलन करण्याच्या उद्देशाने शहर व परिसरात डबक्यातून साचून राहिलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी इंजिनपंपाचा अवलंब सुरु केलेला आहे. तसेच प्रत्येक रहिवाशी निवासस्थानी फॉगिंग फवारणी सुरु केलेली आहे.