माजी विद्यार्थ्यांच्याकडून लॅपटॉप व एल.सी.डी स्क्रीन भेट

परळी : गुरुवार दि. 5 सप्टेंबर रोजी रावसाहेब भाऊसाहेब वांगडे माध्यमिक विद्यालय नित्रळ – निगुडमाळ (ता. जि.सातारा) या विद्यालयामध्ये शिक्षक दिनाच्या प्रसंगी इ.10 वी मार्च 2019 च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच माजी विद्यार्थी मेळावा व माजी विद्यार्थी यांचेमार्फत विद्यालयास शैक्षणिक साहित्य भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सन 2004-05 चे माजी विद्यार्थी रोशन निपाणे, नितीन लोटेकर, विश्वजीत लोटेकर, निलेश लोटेकर, ज्योती देवरे, शर्मिला लोटेकर, विपूल वांगडे, सुरेंद्र वांगडे, श्रीकांत देवरे, सुहास वाईकर, भरत केरेकर, संतोष केरेकर, अनिता पाटील, कौशल्या चिकणे, ज्योती लोटेकर, मिनाक्षी पोफळकर, विकास पोफळकर, उमेश वांगडे, विकास वांगडे, अशोक वाघ, विकास वाघ यांचे मार्फत विद्यालयास लॅपटॉप भेट देण्यात आला.
तसेच माजी विद्यार्थी सागर लोटेकर, तेजस शिंदे यांच्या मार्फत एल.सी.डी स्क्रीन विद्यालयास भेट देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. या शैक्षणिक साहित्याचा उपयोगग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी चांगलाच होणार आहे.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी चंद्रकांत वांगडे, संस्था अध्यक्ष अरविंद जाधव, सचिव लक्ष्मण झणझणे सर्व संस्था संचालक तसेच एकनाथ निपाणे, शामराव निपाणे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सचिव व सर्व कार्यकर्ते परिसरातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सर्व ग्रामस्थ सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. यांनी मुलांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. व इ.10 वी निकाला संदर्भात शाळेचे कौतुकही करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक आनंदा मोरे यांनी प्रास्ताविक केले यावेळी त्यांनी भविष्यात मुलांना तंत्रज्ञान विषयक ज्ञान होईल व डिजीटल इंडिया साकार होण्यास मदत होईल असे मत मांडले व माजी विद्यार्थ्यांचे कौतुकही केले.
डोईफोडे सरांनी आपले विचार मांडले. देशमुख सरांनी सुत्र संचलन केले व सकपाळ सरांनी आभार मानले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.