पोगरवाडी विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

 

वार्ताहर
परळी

न्यू इंग्लिश स्कूल पोगरवाडी तालुका सातारा विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून परळी विभागांमध्ये श्रद्धा विजय जाधव हिने 95.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. प्राजक्ता नितीन काटकर हिने 91 टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय क्रमांक तर दीक्षा शशिकांत घोरपडे येणे 90.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे श्री रंगशीळा एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भानुदास मोहिते उपाध्यक्ष रामभाऊ माने सचिव दीपक शिंदे सहसचिव उद्धव घोरपडे सर्व संचालक पालक ग्रामस्थ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मुख्याध्यापक हनुमंत नलवडे मार्गदर्शक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन केले व सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.