पावसाआधी नाले खोदण्याची मागणी

मातीने नाले झाले जाम, पावसाळा सुरू होण्याआधी उपाययोजना करणे आवश्यक
परळी : निसर्गाचा वरदहस्त असलेला परळी खोरे पंचक्रोशीत पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत परंतु येथील भौतिक गरज यांच्यावर काहीच उपयोजना होताना दिसत नाही. बोरणे घाट रस्त्याची दुरुस्ती झाल्याने वाहतुकीस सोयीस्कर झाले पण गेले वर्षभरात चारी-नाला दगड-मुरुमाने भरलेले आहेत. सातारा आणि ठोसेघर पठार यांना जोडणारा हा घाट रस्ता अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणावर हजारोंच्या संख्येने पर्यटक निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.
पावसाळ्यात गेल्या वर्षात नाले माती मुरूम दगडांनी भरला गेला आहे त्यामुळे डोंगर उतारावरून येणारे पाणी तसेच माती रस्त्यावर पसरते त्यामुळे रस्त्यावरील अपघातांना एक प्रकारे आमंत्रणच मिळते. त्यामुळे ग्रामीण भागातील नाले सफाई पावसा आधी व्हावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.
स्थानिकांचे सहकार्य यातून निर्माण झालेली ही नाळ तुटू नये. देखभाली विना या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होवू नये गत वर्षीचा संपूर्ण पावसाळा नाल्याने नव्हे तर रस्त्याने पाणी वाहत होते. त्यामुळे रस्त्याचा वरचा थर निघू लागलाय. पर्यटन, पवन ऊर्जा, शिक्षण, स्थानिक रानमेवा उत्पादने यांच्या दृष्टीने हा रस्ता जीवनवाहिनी आहे. अनेकदा स्थानिक ग्रामस्थांनी अडथळे बाजूला करुन वाहतूक सुरू करत पुढाकार घेतला आहे . योग्य वेळेत नाले खुले व्हायला हवेत तरच ही नाळ जोडलेली राहिल. यासाठी प्रशासनाने योग्य त्यावेळी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.