सज्जनगडच्या बुरुज तटबंदीची स्वच्छता परळी खोऱयातील 50 मावळय़ांकडून स्वच्छता मोहिम, अंगलाईदेवी मंदीर परिसर झाला स्वच्छ

 

वार्ताहर
परळी
सज्जनगड हा समर्थ भूमी म्हणून ओळखला जातो. सज्जनगडाला मोठी ऐतिहासीक पार्श्वभूमी आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून गडावरील बुरुज अन् तटबंदीची अवस्था ही दैनिय झाली असून पावसाळय़ात काही ठिकाळी तटबंदी ही ढासळत असते. पावसाळय़ात उगवलेल्या झाडांमुळे बुरुज आणि तटबंदी ही ढासळत असल्याने परळी खोऱयातील सुमारे 50 हून अधिक मावळय़ांनी 26 डिसेंबर व 27 डिसेंबर रोजी स्वच्छता मोहिम राबवली.
बुरुज अन् तटबंदी हे गडाचे वैभव समजले जाते. परंतु दर पावसाळय़ात सज्जनगड येथील बुरुज तसेच तटबंदी थोडी थोडी ढासळत असल्याने परळी येथील मावळयांनी सलग दोन दिवस स्वच्छता मोहिम राबवत अंगलाईदेवी मंदीर परिसर तसेच बुरुज-तटबंदीवर पावसाळय़ात आलेल्या मोठ मोठाली झाडे तोडय़ात आले. तसेच असे गडकिल्ल्यांवरली स्वच्छता मोहिमा पुढेही राबवणार असल्याचे मावळयांनी आवर्जून सांगितले.

  • चौकट
    युवकांच्या धडसापुढे पर्यटही अचंबीत
    सध्या जमाना हा सोशलमिडीयाचा आहे. यामुळे बहुतांश तरुणाई ही त्यातच गुरफटलेली दिसून येते मात्र सज्जगडावर कंबरेला रोप बांधून जवळपास 20 ते 25 फूट तटबंदीवर लोबकळत स्वच्छता करत असल्याने सज्जनगडावर येणारे पर्यटकही अचंबित झाले होते. तसेच मावळय़ांनो काळजी घेवून काम करा अशी आर्त हाक ही मिळत होती.