शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त वैराटगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन;शिवक्रांती शिवभुषण पुरस्कार जाहीर

वार्ताहर

परळी

 

शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यां संस्थेच्या वतीने दि. १९ रोजी स्वराज्याचे शस्त्रागार किल्ले वैराटगड येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन कर०यात आले आहे.
सकाळी ८ वा. श्री किल्ले वैराटगड व गडदेवतेचे पुजन , ८.३० वाजता छ. शिवरायांचा पालखी सोहळा व हुतात्मा जवान सुरज मोहिते स्मारक मानवंदना , ९ वा हिंदवी स्वराज्य मानवंदना , ९ .३० वाजता छ. शिवरायांचा पाळणा, १० वा. छ. शिवराज्याभिषेक सोहळा, १०.३० वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचा सत्कार, ११ वा. शिवक्रांती शिवभुषण पुरस्कार २०२१ वितरण समारंभ, ११.३० वा., मान्यवरांची मनोगते , तसेच श्री. लक्ष्मी नारायण भजन मंडळ , लिगाडेवाडी ( गांजे), यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास खा.श्री. छ. उदयनराजे भोसले , आ. श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्री. छ. संभाजीराजे भोसले ( करवीर), माजी आमदार नरेंद्र पाटील , आ. मकरंद पाटील ,माजी शिक्षण सभापती अमितदादा कदम ,|जिवाजी ,,महाले यांचे वंशज प्रकाश सपकाळ ( महाले) आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमात अर्जुन देशमुख, कु. शिल्पा चिकणे, कु. रुक्मीणी केंजळे , कु. अंकिता देशमुख, श्रीकांत बामणे, विश्वास मोरे , सागर पवार , सागर चव्हाण , पत्रकार विशाल कदम , पत्रकार विशाल जगदाळे, पत्रकार अमर वांगडे , योगेश जंगम , जयश्री शेडगे , कोरोना योद्धा किसन साळूंख यांच्यासह , सह्याद्री प्रतिष्ठान जावली, श्री . शिववंदनेश्वर प्रतिष्ठान चंदन वंदन, भटकंती सह्याद्रीची परिवार वाई, शिव स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य . श्री. लक्ष्मी नारायण भजन मंडळ लीगाडेवाडी ( गांजे ) आदींना शिवक्रांती शिवभुषण पुरस्कार देवून सन्मानित कर०यात येणार असल्याची माहिती शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी स्वप्नील धनावडे शशिकांत चिकणे यांनी दिली.