श्रीमंत छ.अभयसिंहराजे भोसले विदयालयाची निकालाची परंपरा कायम

 

वार्ताहर
परळी
महाराष्ट राज्य माध्यमिक परीक्षा मंडळ माध्यमातून मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले विदयालय सोनवडी गजवडीने आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम राखली. 10 वीचा विदयालयाचा निकाल 90.38 टक्के लागला . सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल सलग 100 टक्के तर मराठी माध्यमाचा निकाल 90.38 टक्के लागला . इंग्रजी माध्यमामध्ये स्नेहा प्रकाश बळीप हीने 85.60 टक्के गुण मिळवून प्रथाम कमांक तर प्रणव सुरेश जगताप याने 84.40 टक्के गुण मिळवून दवितीय क्रमांक तर साक्षी सुरेश बळीप हीने 82 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
मराठी माध्यमामध्ये विदया दिलीप चव्हाण हीने 75.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर साक्षी विकास भोसले हीने 73.20 टक्के गुण मिळवून दवितीय क्रमांक तर गणेश सोमनाथ पवार याने 68.20 टक्के गुण मिळवून तृतीय कमांक मिळवला. या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष व पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव, संस्थेचे सचिव लक्ष्मण झणझणे, संचालक धनाजी कदम, युसूब पटेल, राजेंद्र कारंडे, महादेव खामकर, धोंडीराम कदम, सुरेश कारंडे, महेश कदम, गुलाबराव जाधव, शिवाजी कदम, प्रभारी मुख्याध्यापक दिलीप खामकर दोन्ही गावचे सरपंच, पोलिस पाटील तसेच सोनवडी, गजवडी परीसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.