कोरोनाचे विघ्न हरणार विघ्नहर्ताची साकारली प्रतिकृती…! मूर्तिकार गणेश देवरे यांनी साकारली अनोखी गणेश मूर्ती

 

वार्ताहर
परळी
आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन फक्त काही दिवसांवर असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्यातच दरवर्षीप्रमाणे नवनवीन तसेच अनोख्या गणेश मूर्ती साकारण्यात मध्ये मूर्तिकार आपले लक्ष केंद्रित करत असतात त्यातीलच सातारा येथील यवतेश्वर ठिकाणचे मूर्तिकार गणेश देवरे यांनी कोरोनाचे विघ्न दूर करणारी गणेश मूर्तीची प्रतिकृती तयार केली आहे.
जिल्ह्यासह संपूर्ण देशात कोरोनाचे उद्रेक हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा साध्या व सरळ सोप्या मार्गाने साजरा करण्याचे आदेश शासनाने दिले असले तरी गणेश भक्तांच्या उत्साहात तिळमात्र फरक पडलेला दिसत नाही दरवर्षीप्रमाणे नवनवीन गणेश बाप्पांच्या प्रतिकृती या बाजारपेठेत असतात त्या कधीच चित्रपट तसेच कार्टून यांच्या देखील रूपात आपले बाप्पा हे दरवर्षी आपल्या भेटीसाठी येत असतात परंतु कोणाचे संकट हे गडद होत असताना जिल्हासह देशामध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी यवतेश्वर येथील मूर्तिकार गणेश देवरे यांनी कोरोनाचे विघ्न आपला लाडका बाप्पा विघ्नहर्ता हरून जिल्ह्यासह संपूर्ण देशाचे जनजीवन सुरळीत करणार असल्याची प्रतिकृती साकारली असून या मूर्तीला पाहण्यासाठी गणेश भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे.