नेहमी धरणग्रस्तांच्या बाजुने राहणाऱ्या सत्यजितसिंह पाटणकर यांना निवडून द्या :- डॉ. भारत पाटणकर.

पाटण:- या सरकार कडून सर्व सामान्य नागरीकांचे नुसते शोषण चालू आहे. मात्र श्रमिक मुक्ती दल या सरकारचा खोटारडेपणा कदापिही सहन करणार नाही. महाराष्ट्रात श्रमिक मुक्ती दलाची ताकद २० मतदार संघात आहे. तिथे प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्याच उमेदवारांना पाठिंबा देऊन. या सरकारला ताकद दाखवून देणार आहे. पाटण विधानसभा मतदार संघात विक्रमसिंह पाटणकर हे नेहमीच धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने राहिले आहेत. ती परंपरा सत्यजितसिंह पाटणकर यांनी अखंडित ठेवली आहे म्हणूनच पाटण मतदार संघात श्रमिक मुक्ती दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर आहे. असे धरणग्रस्तांचे नेते व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी कोयना येथे धरणग्रस्तांच्या मेळाव्यात सांगितले. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर यांना निवडून आणन्याचा ठराव देखील धरणग्रस्तांनी केला.

यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर, प.स. उपसभापती राजाभाऊ शेलार, प.स. सदस्य बबनराव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पाटण ता. महिला अध्यक्ष स्नेहल जाधव, प.स. माजी सभापती पुजाताई कदम, हरिश्चंद्र दळवी, महेश शेलार, सचिन कदम, विठ्ठल संकपाळ, श्रीपती माने, दिलीप पाटील, चैतन्य दळवी, बाळा कदम, यांची प्रमुख उपस्थिती होती.

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले धरणग्रस्त संकटग्रस्त यांच्या साठी भारत पाटणकर हे एक रासायनिक आहे. यांच्या बरोबरीने पाठपुरावा केल्यास यश नक्कीच आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न मंजूर करण्यासाठी अनेक वेळा आंदोलन करण्यास भाग पडले. म्हणूनच अनेक प्रश्न सुटले. गेल्या पाच वर्षात २८ सुविदासांठी एक नवा पैसा पाटण तालुक्यात आला नाही. तर उत्तर मांड धरणाची खडी चोरीला गेली. म्हणून मंत्रालयात प्रश्न विचारण्यात आला. साखर कारखाना आणि आमदारकी मुळे साखर कारखानावर जप्ती आणली. तर आमदारकीने तालुक्यातील रोजगार बंद केले. आपल्या कामाची जाहिरात मोठ्या प्रमाणात झाली नाही. मात्र अशा जाहिरातीत विरोधक सद्या व्यस्त आहेत. शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. ऐवढी गोंधळाची अवस्था महाराष्ट्रात कधी झाली नाही. हि परस्थिती बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहून खरे बोलणारा लोकप्रतिनिधी सत्यजितसिंह पाटणकर व श्रीनिवास पाटील यांना निवडून द्या. असे त्यांनी सांगितले.

यावेळी सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले हि निवडणूक सर्वांचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. पाटण तालुक्यातील अनेक धरणांची कामे अपूर्ण आहेत. सगळी धरणग्रस्त मंडळी संघर्षातील आहेत. देशात राज्यघटनेची ताकद भाजप युती सरकार बदलण्याच्या प्रयत्नात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी लिहीलेली राज्य घटना जिवंत असल्यामुळे. धरणग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत आहेत. असे सांगून ते पुढे म्हणाले पाटणचा तरुण रोजगारासाठी बाहेर न जाता याच तालुक्यातच राहिला पाहिजे. यासाठी नवीन महाबळेश्वर प्रकल्प महत्वाचा आहे. आजच्या आमदारांच्या कर्तृत्वाने कोयनेतील पर्यटन बंद आहे. कधी स्वतः चांगले केले नाही. आणि दुसरे करेल त्याला चांगले करून दिले नाही. अशा मानसिकतेत असणाऱ्यानां घरी बसविण्याची हिच ती वेळ आहे.

राजाभाऊ शेलार म्हणाले जातीयवादी पक्षाला कधीही मतदान करणार नाही. ८० वर्षाचा तरुण आज वैचारिक मुद्याने पुढे आले आहेत. रात्र वैऱ्याची आहे. सत्यजितसिंह पाटणकर आपण स्वतः आहे. असे समजून काम करायचे आहे. कोयनेतील पर्यटन थांबता कामा नये. या प्रकल्पातून कोयना भागातील तीन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रकल्प ग्रस्तांच्या लोकांविषयी सद्याच्या आमदारांना अस्ता नाही. सगळे उध्दोग या महाशयांनी बंद पाडले. तर प्रकलग्रस्तांचे कोणतेही काम मार्गी लावले नाही. असे शेवटी त्यांनी सांगितले.

यावेळी हरिश्चंद्र दळवी, महेश शेलार, सचिन कदम, विठ्ठल संकपाळ, श्रीपती माने, दिलीप पाटील, चैतन्य दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यास पाटण तालुक्यातील धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी चैतन्य दळवी यांनी आभार मानले.